MI vs RCB सामन्यात दिसलेली मिस्ट्री गर्ल कोण? नेटकऱ्यांनी लावला भलताच तर्क

IPL 2024 Mystery Girl: गुरूवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि आरसीबी यांच्यात सामना झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 06:59 PM2024-04-12T18:59:19+5:302024-04-12T18:59:53+5:30

whatsapp join usJoin us
Netizens are saying that the mystery girl who went viral in the IPL 2024 MI vs RCB match is Bollywood actress Shraddha Kapoor's sister | MI vs RCB सामन्यात दिसलेली मिस्ट्री गर्ल कोण? नेटकऱ्यांनी लावला भलताच तर्क

MI vs RCB सामन्यात दिसलेली मिस्ट्री गर्ल कोण? नेटकऱ्यांनी लावला भलताच तर्क

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 MI vs RCB: गुरूवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि आरसीबी यांच्यात सामना झाला. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेला सामना विविध कारणांनी खास ठरला. सांघिक खेळीच्या जोरावर यजमान मुंबईच्या संघाने मोठा विजय मिळवला. (MI vs RCB Match Updates) सलग दुसरा विजय मिळवताना मुंबईकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने कमाल केली. आव्हानाचा पाठलाग करताना इशान किशन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी सांघिक खेळी करून आरसीबीला पराभवाची धूळ चारली. आयपीएलच्या सामन्यांदरम्यान नेहमी मिस्ट्री गर्लचे फोटो व्हायरल होत असतात. आता एक अशीच मिस्ट्री गर्ल प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. (IPL 2024 News) 

वानखेडे स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीत बसलेली मिस्ट्री गर्ल पाहून नेटकऱ्यांनी भलताच तर्क लावल्याचे दिसते. अनेकांनी तिची तुलना बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरशी केली. तर काहींनी ही दुसरी श्रद्धा कपूर असल्याचे म्हटले. काही नेटकऱ्यांनी श्रद्धा कपूरची बहीण आहे अशा आशयाच्या कमेंट्स मिस्ट्री गर्लच्या फोटोवर केल्या. 

दरम्यान, गुरूवारी झालेल्या सामन्यात आरसीबीने मुंबईला १९७ धावांचे आव्हान दिले होते. मुंबई इंडियन्सने अवघ्या १५.३ षटकांत लक्ष्य गाठत सलग दुसरा विजय मिळवला. यजमान मुंबई इंडियन्सच्या संघाने फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. जसप्रीत बुमराहने ५ बळी घेत आरसीबीच्या फलंदाजीची कंबर मोडली. आरसीबीविरूद्धच्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्स क्रमवारीत ७व्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर आरसीबी नवव्या स्थानी आहे. 

Web Title: Netizens are saying that the mystery girl who went viral in the IPL 2024 MI vs RCB match is Bollywood actress Shraddha Kapoor's sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.