Join us

नेहराच्या निवृत्तीवर भावुक झालेल्या युवीने गतस्मृतींना दिला उजाळा

आशिष नेहरा हा माझा खरा मित्र असून प्रेरणा असल्याचे युवराज सिंग याने म्हटले आहे. नेहराच्या निवृत्तीवर भावुक झालेल्या युवीने गतस्मृतींना उजाळा दिला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 03:06 IST

Open in App

नवी दिल्ली : आशिष नेहरा हा माझा खरा मित्र असून प्रेरणा असल्याचे युवराज सिंग याने म्हटले आहे. नेहराच्या निवृत्तीवर भावुक झालेल्या युवीने गतस्मृतींना उजाळा दिला.नेहरा सारखा बोलत असल्याने गांगुली त्याला ‘पोपट’ म्हणायचा. तुम्ही नेहरासोबत असाल तर दिवस खराब जाणार नाही. तो हसून हसून लोळायला लावतो. ११ वेळा शस्त्रक्रिया होऊनदेखील मेहनत आणि खेळ यात कुठेही तफावत आली नाही. मी स्वत: कर्करोगावर मात केली. नेहरा दुटप्पी भूमिकेत वावरत नाही, हे विशेष. जे मनात असेल ते बोलून मोकळा होत असल्याने त्याला फटका बसत असल्याचे स्पष्ट केले. २०११ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सिनियर खेळाडू असूनही त्याला बाहेर बसावे लागले. त्याने आमच्यासाठी टॉवेल, पाणी आणले. एक प्रामाणिक मित्र दिल्याबद्दल मी क्रिकेटचा आभारी असल्याचे युवीने सांगितले.

टॅग्स :क्रिकेट