Join us

नरेनची शैली पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सुनील नरेनच्या गोलंदाजी शैलीवर साशंकता व्यक्त करण्यात आली आहे. त्याच्या गोलंदाजी शैलीची तक्रार करण्यात आली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 01:26 IST

Open in App

कराची : पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सुनील नरेनच्या गोलंदाजी शैलीवर साशंकता व्यक्त करण्यात आली आहे. त्याच्या गोलंदाजी शैलीची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्याच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नरेन या टी-२० लीगमध्ये लाहोर कलंदर्स फ्रॅन्चायझीचे प्रतिनिधित्व करीत होता. सामनाधिकाºयांनी बुधवारी रात्री क्वेटा ग्लॅडिएटर्सविरुद्धच्या लढतीनंतर त्याच्या गोलंदाजी शैलीवर आक्षेप नोंदवला. नरेनला ताकीद देण्यात आलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये ठेवण्यात आले असून तो स्पर्धेत गोलंदाजी करू शकतो, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे. यामुळे आयपीएलमधील त्याच्या सहभागाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. (वृत्तसंस्था)