Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुरली विजयची सराव सामन्यात नाबाद शतकी खेळी

मुरली विजय याने क्रिकेट आॅस्ट्रेलिया एकादशविरुद्ध सराव सामन्यात नाबाद शतकी खेळी केली, तर ज्याचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय होता त्या लोकेश राहुलनेदेखील अर्धशतक ठोकून संघव्यवस्थापनाची चिंता दूर केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 04:25 IST

Open in App

सिडनी : मुरली विजय याने क्रिकेट आॅस्ट्रेलिया एकादशविरुद्ध सराव सामन्यात नाबाद शतकी खेळी केली, तर ज्याचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय होता त्या लोकेश राहुलनेदेखील अर्धशतक ठोकून संघव्यवस्थापनाची चिंता दूर केली.इंग्लंड दौऱ्याच्या मध्येच बाहेर करण्यात आलेल्या विजयने भारतीय कसोटी संघात पुनरागमन केले. त्याने ११८ चेंडूंत नाबाद शतक ठोकले. पहिल्या ५० धावा मुरलीने ९१ चेंडूंत तर नंतरच्या ५० धावा केवळ २७ चेंडूंत केल्या. जॅक कॉर्डरच्या सहा चेंडूंत २६ धावा कुटल्या.त्याआधी राहुलने ९८ चेंडूंत ६२ धावा केल्या. दोघांनी सलामीला १०९ धावांची भागीदारी केली. चौथ्या आणि अखेरच्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताने दुसºया डावात ४३.४ षटकांत दोन बाद २११ पर्यंत मजल मारली होती. अपयशाचा सामना करणाºया लोकेशने आज आठ चौकार आणि एक षटकार मारला. फुलटॉसवर तो मिडविकेटला झेल देत बाद झाला. हनुमा विहारी तिसºया स्थानी १५ धावांवर नाबाद राहिला.त्याआधी क्रिकेट आॅस्ट्रेलिया एकादशने १५१.१ षटकांत ५४४ धावा केल्या. भारताने पहिल्या डावात २५८ धावा उभारल्या होत्या. मोहम्मदशमीने तीन, तर आश्विनने दोन गडी बाद केले. >आॅस्ट्रेलियात माझा खेळ बहरतो : विजयइंग्लंड दौºयात कसोटी मालिकेत बाहेर करण्यात आल्यामुळे निराश झालेला मुरली विजय मरगळ झटकून पुन्हा सलामीला येण्यास सज्ज झाला आहे. शनिवारी सराव सामन्यात त्याने नाबाद शतक ठोकले. उसळी घेणाºया येथील खेळपट्ट्यांवर बॅकफूटवर जाऊन खेळणे मला पसंत असल्याचे सांगून आॅस्ट्रेलियात आपला खेळ बहरतो, असे त्याने सांगितले.सराव सामन्यात अशा प्रकारची चमक दाखविणे सुखद आहे. संधी मिळताच सकारात्मक खेळ करण्याचा माझा निर्धार होता. मी तेच केले. मी खेळ आणि फिटनेसवर मेहनत घेत आहे. संघाच्या यशात योगदान देण्याचा माझा निर्धार असून मी ते करू शकतो, याची खात्रीही आहे. आॅस्ट्रेलियात पुन्हा कसोटी खेळण्यास उत्सुक आहे.लोकेश आणि मी एकमेकांना समजून घेण्याची आमच्यात कला आहे. पहिल्या कसोटीत या गोष्टी संघासाठी फारच उपयुक्त ठरू शकतील. मी येथे बॅकफूटचा अधिक वापर करीत असल्याने आॅस्ट्रेलियात खेळणे मला आवडते. चेंडूला उसळी लाभल्यास आवडते फटकेदेखील मारू शकतो.>भारताची गोलंदाजी सर्वोत्कृष्ट : लॉसनसध्याचा भारतीय मारा सर्वोत्कृष्ट असून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत आॅस्ट्रेलियाच्या फलंदाजांना त्यांच्याकडून कडवे आव्हान मिळेल, अशी प्रतिक्रिया माजी वेगवान गोलंदाज जेफ लॉसन यांनी व्यक्त केली.लॉसन म्हणाले, ‘भारताकडे उत्कृष्ट वेगवान आणि फिरकी गोलंदाज आहेत. ईशांत शर्माच्या चेंडूत कमालीची उसळी आहे. उमेश यादव आणि मोहम्मद शमी हेदेखील भेदक मारा करण्यात पटाईत आहेत. भुवनेश्वर कुमारचे चेंडू चांगले स्विंग होतात.यापैकी तीन वेगवान गोलंदाजांना भारत संधी देईल. एक किंवा दोन फिरकी गोलंदाज अंतिम ११ जणांत असतीलच.’ अ‍ॅडिलेड येथे मालिका सुरू होत असल्याचा भारताला लाभ होईल, असे भाकीत लॉसन यांनी केले.>आक्रमक पण खेळभावनेने खेळा : एडिग्ज]क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे नवनियुक्त अध्यक्ष अर्ल एडिग्ज यांनी आपल्या संघाला ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत आक्रमक पण खेळभावनेने खेळण्याचा सल्ला दिला आहे. नवे कोच जस्टिन लँगर यांच्यासह खेळाडूंकडून प्रामाणिकपणे खेळण्याची अपेक्षा बाळगली जात आहे.एडिग्ज यांनी सिडनी मॉर्निंग हेरॉल्डला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, ‘चांगले आणि आक्रमक खेळा पण प्रामाणिकपणला मूठमाती देऊ नका. खेळभावना विसरू नका, असा सल्ला दिला. चाहत्यांना तुमच्याकडून बचावात्मक नव्हे, तर आक्रमक खेळाचीच अपेक्षा आहे.’>मालिका जिंकण्याची भारताला संधी : वॉचार सामन्यांची आगामी कसोटी मालिका जिंकण्याची भारताला मोठी संधी असल्याचे मत आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने व्यक्त केले आहे. मालिकेतील पहिला सामना अ‍ॅडिलेड येथे ६ डिसेंबरपासून खेळला जाईल. क्रिकइन्फोशी बोलताना वॉ म्हणाला, ‘माझ्या मते आॅस्ट्रेलियात पहिली कसोटी मालिका जिंकण्याची भारताला सुवर्णसंधी आहे. दीर्घ काळापासून या दौºयाची तयारी सुरू असल्याने ही मालिका अटीतटीची होईल, यात शंका नाही.’आॅस्ट्रेलिया संघाकडे विराटच्या फलंदाजीला आवर घालण्याचे कुठले डावपेच असतील, असे विचारताच वॉ म्हणाला, ‘विराट महान खेळाडू असून सचिन आणि लारा यांच्यासारखेच विराटला मोठे सामने आवडतात.’ माजी यष्टिरक्षक-फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्ट याने भारतीय संघ कोहलीच्या खेळावर विसंबून असल्याचे नमूद केले.