रणजी ट्रॉफी स्पर्धेतील जम्मू काश्मीर विरुद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकूरनं मुंबई संघाच्या ताफ्यात जीवात जीव आणणारी खेळी साकारलीये. पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करून मुंबईच लाज राखणाऱ्या शार्दुल ठाकूर दुसऱ्या सामन्यात कमाल केली. स्टार बॅटिंग ऑर्डरचा भरणा असताना मुंबईचा संघ अडचणीत सापडला होता. मुंबईचा संघ अडचणीत सापडला असताना शार्दुल ठाकूरनं पुन्हा एकदा आपल्या बॅटिंगच्या जोरावर संघाला संकटातून बाहेर काढणारी खेळी करून दाखवली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्या डावात फिफ्टी, दुसऱ्या डावात आली कडक सेंच्युरी!
जम्मू काश्मीर विरुद्धच्या रणजी सामन्यात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या टीम इंडियाच्या ताफ्यातील स्टार मंडळीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण त्यांना जे जमलं नाही ते शार्दुल ठाकूरनं करून दाखवलं. त्याने या सामन्यात पहिल्या डावात अर्धशतक झळकावून संघासाठी खेळी केली होती. दुसऱ्या डावात त्याने शतकी खेळीसह संघाला मजबूत स्थितीत नेले.
आठव्या विकेटसाठी १५० + ची भागीदारी
आठव्या विकेटसाठी तनुष कोटियनच्या साथीनं १५० + ची भागीदारी
जम्मू काश्मीर विरुद्धच्या लढतीत भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा, टीम इंडियातील स्टार बॅटर यशस्वी जैस्वाल या जोडीनं मुंबईच्या डावाची सुरुवात केली. दोन्ही डावात या दोघांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. मुंबई संघाचा कर्णधार अंजिक्य रहाणे आणि श्रेयस अय्यरही अगदी स्वस्तात माघारी फिरले. संघ अडचणीत असताना शार्दुल ठाकुर पुन्हा संघासाठी धावून आला. त्याने तनुष कोटियनच्या साथीनं मुंबई संघाचा डाव सावरला. या जोडीनं आठव्या विकटसाठी १५० पेक्षा अधिक धावांची भागीदारी रचली.