Join us  

IPL Auction 2018: पृथ्वी शॉ झाला कोट्यधीश; मुंबईचा वीर खेळणार दिल्लीकडून

आयपीएलच्या लिलावात एकूण 578 खेळाडूंवर बोली लागणार आहे. यात 244 क्रिकेटपटू कॅप प्लेअर आहेत अन्य 332 खेळाडू अनकॅप कॅटेगरीमध्ये आहेत. कॅप प्लेअर्सची बेस प्राईस 2 कोटी रुपये तर अनकॅप प्लेअरची बेस प्राईस 20 लाख रुपये आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 4:51 PM

Open in App
ठळक मुद्देशालेय क्रिकेटपासूनच पृथ्वी शॉ हे नाव चर्चेत असून लवकरच तो भारतीय संघात दाखल होईल असा क्रिकेट पंडितांचा अंदाज आहे.

बंगळुरु - रणजी करंडक स्पर्धा आणि सध्या सुरु असलेल्या अंडर-19 वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करत असलेल्या मुंबईच्या पृथ्वी शॉ वर आज आयपीएलच्या लिलावात 1 कोटी 20 लाख रुपयांची बोली लागली. दिल्ली डेअरडेव्हिल्सने पृथ्वीला विकत घेतले. अंडर 19 मधला दुसरा खेळाडू शुभम गिलला कोलकाता नाईट रायडर्सने एक कोटी 80 लाखांना विकत घेतले. 

एकूण 578 खेळाडूंवर बोली लागणार आहे. यात 244 क्रिकेटपटू कॅप प्लेअर आहेत अन्य 332 खेळाडू अनकॅप कॅटेगरीमध्ये आहेत. कॅप प्लेअर्सची बेस प्राईस 2 कोटी रुपये तर अनकॅप प्लेअरची बेस प्राईस 20 लाख रुपये आहे. पृथ्वी आणि गिल यांची बेसप्राईस 20 लाख रुपये होती. फर्स्ट क्लासच्या 9 सामन्यांमध्ये पृथ्वी शॉ ने 961 धावा फटकावल्या असून यात पाच शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. 

शालेय क्रिकेटपासूनच पृथ्वी शॉ हे नाव चर्चेत असून लवकरच तो भारतीय संघात दाखल होईल असा क्रिकेट पंडितांचा अंदाज आहे. सध्या सुरु असलेल्या अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेतही पृथ्वी शॉ ने आपल्या परफॉर्मन्समधून भविष्यातल्या स्टारची चुणूक दाखवून दिली आहे.                                   

टॅग्स :आयपीएल लिलाव 2018पृथ्वी शॉ