मुंबई इंडियन्स विजयी हॅट्ट्रिकसाठी सज्ज

हार्दिक पांड्या पंजाबसाठी डोकेदुखी ठरु शकतो. त्याला रोखणे पंजाबसाठी निर्णायक ठरु शकेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 07:06 AM2019-04-10T07:06:47+5:302019-04-10T07:06:50+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indians ready for winning hat-trick | मुंबई इंडियन्स विजयी हॅट्ट्रिकसाठी सज्ज

मुंबई इंडियन्स विजयी हॅट्ट्रिकसाठी सज्ज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : अडखळत्या सुरुवातीनंतर सलग दोन विजय मिळवून फॉर्ममध्ये आलेल्या मुंबई इंडियन्सपुढे बुधवारी घरच्या मैदानावर किंग्स इलेव्हन पंजाबचे कडवे आव्हान आहे. मुंबईकर ६ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी असून, पंजाब ८ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.


वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात मुंबईला नमविण्यासाठी पंजाबला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. या आधी मोहाली येथे पंजाबने मुंबईला ८ गड्यांनी नमविले होते. याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी आता मुंबईकरांनी कंबर कसली आहे. गेल्या सामन्यात मुंबईचा तारणहार ठरलेला वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ याच्याकडून पुन्हा एकदा भेदक गोलंदाजीची संघाला अपेक्षा असेल.

मुंबईने बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्स व सनरायझर्स हैदराबाद यांना सलग नमवून विजयी कूच केली आहे. दोन्ही संघांना मुंबईकरांनी कमी धावसंख्येच्या सामन्यात पराभूत केले असल्याने, पंजाबच्या फलंदाजांना मुंबईच्या तगड्या गोलंदाजीपुढे सावधपणे खेळावे लागेल.

Web Title: Mumbai Indians ready for winning hat-trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.