Join us  

Corona Virus : मुंबई क्रिकेट असोसिएसनचं मोठं पाऊल; राज्य सरकारला दिला मदतीचा हात

मुंबई क्रिकेट असोसिएशननं ( एमसीए) गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेतला. कोरोना व्हायरसशी मुकाबला करणाऱ्या राज्य सरकारला एमसीएनं 50 लाखांची मदत ...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 4:23 PM

Open in App

मुंबई क्रिकेट असोसिएशननं ( एमसीए) गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेतला. कोरोना व्हायरसशी मुकाबला करणाऱ्या राज्य सरकारला एमसीएनं 50 लाखांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय कोरोंटाईन लोकांसाठी वानखेडे स्टेडियम खुलं करण्याचा प्रस्तावही त्यांनी राज्य सरकारसमोर ठेवला असल्याचे समजते.

एमसीएचे सचिव संजय नाईक यांनी सांगितले की,''आज सर्व सदस्यांची बैठक झाली. व्हिडीओ कॉन्फरन्सींगही ही बैठक पार पडली. त्यात राज्य सरकारला 50 लाखांची मदत करण्याचा निर्णय घेतला गेला. हा निधी मुख्यमंत्री मदत निधीत ही रक्कम जमा केली जाईल.'' त्याशिवाय एमसीएनं कोरोंटाईन लोकांसाठी वानखेडे स्टेडियम खुलं करण्याचाही निर्णय घेण्यात आला आल्याचे त्यांनी सांगितले. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मोठ्या मनाचा माणूस; दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर अन् त्याच्या पत्नीची कोट्यवधींची मदत 

Shocking : आफ्रिकेच्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू

क्रीडा विश्व धावलं मदतीला, पण क्रिकेटचा देव अन् कॅप्टन कोहली करताहेत फक्त आवाहन!

श्रीलंका, बांगलादेश अन् आता पाकिस्तान क्रिकेट मंडळानंही दिला मदतीचा हात; BCCI पुढाकार कधी घेणार?

Video : शोएब अख्तर देतोय कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी बाबा रामदेव यांच्या टिप्स

ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूची दोन राज्यांना आर्थिक मदत

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई