Join us  

मुंबई, चेन्नई सलामीच्या लढतीत भिडणार; आयपीएल वेळापत्रक जाहीर

१० नोव्हेंबरला होणार अंतिम सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 12:38 AM

Open in App

दुबई : संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या यंदाच्या आयपीएलचे वेळापत्रक अखेर रविवारी जाहीर करण्यात आले. गतविजेते मुंबई इंडियन्स विरुद्ध उपविजेते चेन्नई सुपरकिंग्ज असा हायव्होल्टेज सामन्याने अबुधाबी येथे यंदाच्या आयपीएलची १९ सप्टेंबरला धडाक्यात सुरुवात होईल. त्याचप्रमाणे स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला होईल.

विशेष म्हणजे पहिल्यांदाच आयपीएलमध्ये अंतिम सामना रविवारऐवजी मंगळवारी खेळविण्यात येईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार यंदाच्या आयपीएलमध्ये दहा डबल हेडर, म्हणजे एकाच दिवशी दोन सामने होतील. त्याच वेळी प्रत्येक सामना अर्ध्या तासाने आधी सुरूहोईल. याआधी रात्री ८ वाजता सुरू होणारे सामने आता भारतीय वेळेनुसार ७.३०, तर संध्याकाळी ४ वाजता होणारे सामने दुपारी ३.३० वाजल्यापासून खेळविण्यात येतील.

आयपीएल समितीने सध्या साखळी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून बाद फेरीच्या सामन्यांचे वेळापत्रक काही दिवसांनी घोषित करण्यात येईल, अशी माहिती दिली. यंदाची स्पर्धा ५३ दिवस रंगणार असून यंदाचे सत्र स्पर्धा इतिहासातील सर्वात लांबलचक सत्र ठरेल. (वृत्तसंस्था)

सर्वाधिक सामने दुबईमध्ये!आयपीएलमधील यंदाचे सामने दुबई, अबुधाबी आणि शारजाह येथे खेळविण्यात येतील. यापैकी दुबईमध्ये सर्वाधिक २४ सामन्यांचे आयोजन होणार असून अबुधाबी आणि शारजाह येथे अनुक्रमे २० आणि १२ सामने खेळविण्यात येतील.

म्हणून झाला उशीर !

आयपीएलचे वेळापत्रक उशिराने जाहीर झाले आणि त्यास कारण ठरले ते चेन्नई सुपरकिंग्ज. दीपक चहर आणि ॠतुराज गायकवाड यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील ११ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बीसीसीआयने आयपीएल वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय रोखून ठेवला. कारण, कोरोनाग्रस्त सदस्यांची संख्या वाढल्यास किंवा परिस्थिती न सुधारल्यास सलामीच्या सामन्यासाठी चेन्नईला संधी द्यावी की नाही, यावर आयपीएल समितीचा विचार सुरू होता. मात्र शुक्रवारी चेन्नईचे सर्व सदस्य कोरोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले आणि आयपीएलवरील सर्वात मोठे विघ्न दूर झाले.

आयपीएल २०२० वेळापत्रकदिनांक सामना वेळ स्थळ१९ सप्टेंबर मुंबई वि. चेन्नई ७.३० अबुधाबी२० सप्टेंबर दिल्ली वि. पंजाब ७.३० दुबई२१ सप्टेंबर हैदराबाद वि. बंगलोर ७.३० दुबई२२ सप्टेंबर राजस्थान वि. चेन्नई ७.३० शारजाह२३ सप्टेंबर कोलकाता वि. मुंबई ७.३० अबुधाबी२४ सप्टेंबर पंजाब वि. बंगलोर ७.३० दुबई२५ सप्टेंबर चेन्नई वि. दिल्ली ७.३० दुबई२६ सप्टेंबर कोलकाता वि. हैदराबाद ७.३० अबुधाबी२७ सप्टेंबर राजस्थान वि. पंजाब ७.३० शारजाह२८ सप्टेंबर बंगलोर वि. मुंबई ७.३० दुबई२९ सप्टेंबर दिल्ली वि. हैदराबाद ७.३० अबुधाबी३० सप्टेंबर राजस्थान वि. कोलकाता ७.३० दुबई१ आॅक्टोबर पंजाब वि. मुंबई ७.३० अबुधाबी२ आॅक्टोबर चेन्नई वि. हैदराबाद ७.३० दुबई३ आॅक्टोबर बँगलोर वि. राजस्थान ३.३० अबुधाबी३ आॅक्टोबर दिल्ली वि. कोलकाता ७.३० शारजाह४ आॅक्टोबर मुंबई वि. हैदराबाद ३.३० शारजाह४ आॅक्टोबर पंजाब वि. चेन्नई ७.३० दुबई५ आॅक्टोबर बंगलोर वि. दिल्ली ७.३० दुबई६ आॅक्टोबर मुंबई वि. राजस्थान ७.३० अबुधाबी७ आॅक्टोबर कोलकाता वि चेन्नई ७.३० अबुधाबी८ आॅक्टोबर हैदराबाद वि. पंजाब ७.३० दुबई९ आॅक्टोबर राजस्थान वि. दिल्ली ७.३० शारजाह१० आॅक्टोबर पंजाब वि कोलकाता ३.३० अबुधाबी१० आॅक्टोबर चेन्नई वि. बंगलोर ७.३० दुबई११ आॅक्टोबर हैदराबाद वि. राजस्थान ३.३० दुबई११ आॅक्टोबर मुंबई वि. दिल्ली ७.३० अबुधाबी१२ आॅक्टोबर बंगलोर वि. कोलकाता ७.३० शारजाह१३ आॅक्टोबर हैदराबाद वि चेन्नई ७.३० दुबई१४ आॅक्टोबर दिल्ली वि. राजस्थान ७.३० दुबई१५ आॅक्टोबर बंगलोर वि. पंजाब ७.३० शारजाह१६ आॅक्टोबर मुंबई वि. कोलकाता ७.३० अबुधाबी१७ आॅक्टोबर राजस्थान वि. बंगलोर ३.३० दुबई१७ आॅक्टोबर दिल्ली वि. चेन्नई ७.३० शारजाह१८ आॅक्टोबर हैदराबाद वि. कोलकाता ३.३० अबुधाबी१८ आॅक्टोबर मुंबई वि. पंजाब ७.३० दुबई१९ आॅक्टोबर चेन्नई वि. राजस्थान ७.३० अबुधाबी२० आॅक्टोबर पंजाब वि. दिल्ली ७.३० दुबई२१ आॅक्टोबर कोलकाता वि. बंगलोर ७.३० अबुधाबी२२ आॅक्टोबर राजस्थान वि. हैदराबाद ७.३० दुबई२३ आॅक्टोबर चेन्नई वि. मुंबई ७.३० शारजाह२४ आॅक्टोबर कोलकाता वि. दिल्ली ३.३० अबुधाबी२४ आॅक्टोबर पंजाब वि. हैदराबाद ७.३० दुबई२५ आॅक्टोबर बंगलोर वि. चेन्नई ३.३० दुबई२५ आॅक्टोबर राजस्थान वि. मुंबई ७.३० अबुधाबी२६ आॅक्टोबर कोलकाता वि. पंजाब ७.३० शारजाह२७ आॅक्टोबर हैदराबाद वि. दिल्ली ७.३० दुबई२८ आॅक्टोबर मुंबई वि. बंगलोर ७.३० अबुधाबी२९ आॅक्टोबर चेन्नई वि. कोलकाता ७.३० दुबई३० आॅक्टोबर पंजाब वि. राजस्थान ७.३० अबुधाबी३१ आॅक्टोबर दिल्ली वि. मुंबई ३.३० दुबई३१ आॅक्टोबर बंगलोर वि. हैदराबाद ७.३० शारजाह०१ नोव्हेंबर चेन्नई वि. पंजाब ३.३० अबुधाबी०१ नोव्हेंबर कोलकाता वि. राजस्थान ७.३० दुबई०२ नोव्हेंबर दिल्ली वि. बंगलोर ७.३० अबुधाबी०३ नोव्हेंबर हैदराबाद वि. मुंबई ७.३० शारजाह

टॅग्स :आयपीएल 2020बीसीसीआय