तीन दिवसांपूर्वी जर आयपीएलचे यजमानपद भूषविणाऱ्या शहरातील बालकांना विचारले असते की तुम्ही फलंदाज होऊ इच्छिता की गोलंदाज तर अनेकांचे उत्तर फलंदाज असे असते. पण, या लीगमध्ये गेल्या दोन लढतींमध्ये स्थिती बदलली आहे. खेळपट्टी संथ होत असल्यामुळे फिरकीपटू अधिक महत्त्वाची भूमिका बजावतील, यात मला कुठला संशय नाही.
पंजाब व हैदराबादने सिद्ध केले की, प्रथम फलंदाजी केल्यानंतरही संघ विजयाच्या शर्यतीतून बाहेर होत नाही. या दोन्ही संघांनी छोट्या लक्ष्याचा योग्य बचाव केला. त्यामुळे लीगचे संतुलन साधल्या गेले.
अफगाणिस्तानच्या दोन फिरकीपटूंनी शानदार कामगिरी करीत फ्रॅन्चायसीने त्यांच्यावर लिलावामध्ये खर्च केलेली रक्कम योग्यच असल्याचे सिद्ध केले आहे. विशेषत: ते कुठल्या भागातून येतात आणि त्यांना कुठल्या अडचणींना सामोरे जावे लागते हे बघितल्यानंतर त्यांची कामगिरी विशेष ठरते. क्रिकेट आता खºया अर्थाने वैश्विक खेळ होण्याच्या मार्गाने वाटचाल करीत आहे. त्याचे श्रेय या फिरकीपटूंनाही जाते. मुजीब-उर-रहमान केवळ १७ वर्षांचा आहे, पण ज्या पद्धतीने त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या लढतीत अखेरचे षटक टाकले, निश्चितच सुखावणारे चित्र होते. १७ धावांचा बचाव करताना त्याने चांगला मारा केला. प्रत्येक लढतीत बळी आणि ६.९१ चा इकॉनॉमी रेट ही चांगली कामगिरी आहे. दुसºया बाजूचा विचार करता राशिद खानने अपेक्षेनुरूप कामगिरी केली आहे. या लेग स्पिनरने आतापर्यंत प्रति षटक ७.५८ च्या सरासरीने धावा दिल्या आहेत. मला या स्पर्धेत पहिल्या दोन आठवड्यांमध्ये लगावल्या गेलेल्या षटकारांपेक्षा या दोन फिरकीपटूंची कामगिरी बघून अधिक आनंद मिळाला. त्यामुळे आगामी लढतींमध्ये फलंदाजी व गोलंदाजी यामध्ये समतोल साधल्या गेल्याचे दिसून येईल, असे वाटते. (टीसीएम)