Join us  

प्रोडक्शन हाऊस, सेंद्रीय शेती अन् आता 'कडकनाथ' पालन; MS Dhoniनं ऑर्डर केल्या २००० कोंबड्या! 

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी  १५ ऑगस्ट २०२० ही तारीख धक्का देणारी ठरली. याच दिवशी धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

By स्वदेश घाणेकर | Published: November 13, 2020 3:28 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी  १५ ऑगस्ट २०२० ही तारीख धक्का देणारी ठरली. याच दिवशी धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर झालेल्या Indian Premier League ( IPL 2020) मध्ये धोनीच्या फटकेबाजीचा आस्वाद मिळेल, अशी अपेक्षाही फोल ठरली. धोनीच्या Chennai Super Kings संघाला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. वन डे वर्ल्ड कपनंतर धोनी बराच काळ रांचीतील फार्महाऊसवर होता आणि कोरोना संकटाच्या काळात त्यानं सेंद्रीय शेतीबाबत शिकून घेतले. याच काळात धोनी स्वतःचं प्रोडक्शन हाऊस काढणार असल्याचेही समोर आले. आता धोनी आणखी एका व्यावसायाकडे वळला आहे.

रांची येथील फार्म हाऊसमध्ये धोनी आता कडकनाथ कोंबड्यांचे पालन करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. मध्यप्रदेशातील भिलांचल भागातील प्रसिद्ध काळी कोंबडी ही 'कडकनाथ' नावाने ओळखली जाते. मध्य प्रदेशातील झबुआ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याकडून धोनीने रांची येथील फार्म हाऊससाठी २००० कोंबड्यांची ऑर्डर दिली आहे. विनोद मेधाला असे या शेतकऱ्याचे नाव असून धोनीच्या मॅनेजरने त्याच्याशी संपर्क साधून कोंबड्यांची ऑर्डर दिली आहे. १५ डिसेंबरपर्यंत शेतखऱ्याला ही ऑर्डर द्यायची आहे. वा माही, वा : महेंद्रसिंग धोनीचा जाहीरातींना नकार; नैसर्गिक खताचा ब्रँड तयार करणार!

''धोनीच्या फार्म हाऊसमधील मॅनेजरने तीन महिन्यांपूर्वी कृषी विकास केंद्राच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधला. पाच दिवसांपूर्वी त्यांनी २००० कोंबड्यांची ऑर्डर दिली. १५ डिसेंबरपर्यंत या कोंबड्या रांचीला पोहचवायच्या आहेत. यासाठीचे पैसे धोनीच्या टीमने दिले आहेत,'' अशी माहिती विनोद मेधा यांनी दिली. 

मध्य प्रदेशातील कृषी विज्ञान केंद्रातील कडकनाथ कोंबडी प्रकल्पाशी संबंधित अधिकारी असणाऱ्या डॉ. चंदन कुमार यांनी The New Indian Expressकडे या वृत्ताला दुजोरा दिला. ''धोनीच्या फार्म हाऊसचं मॅनेजमेंट सांभाळणारा कुणाल गौरव याने काही दिवसांपूर्वी रांचीत कडकनाथ कोंबड्यांबद्दल चौकशी केली होती. मध्य प्रदेशात कोणाकडे मोठ्या प्रमाणात कडकनाथ कोंबडी मिळेल याचा आम्ही तपास केला. त्यानंतर विनोद मेधा यांचं नाव,''असे चंदन कुमार यांनी सांगितले.  रांची येथील आपल्या ४३ एकराच्या फार्म हाऊसवर धोनीने सेंद्रीय शेतीचा प्रयोग सुरु केला आहे.  Do You Know : महेंद्रसिंग धोनीचे जाहिरात अन् क्रिकेट व्यतिरिक्त 'हे' सात इन्कम सोर्स!

धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.  

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीव्यवसाय