Join us  

महेंद्रसिंग धोनीचं सर डॉन ब्रॅडमन यांच्या पावलावर पाऊल

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 31 जुलैपासून काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्याच्या खांद्याला खांदा लावून गस्त घालणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 12:21 PM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 31 जुलैपासून काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्याच्या खांद्याला खांदा लावून गस्त घालणार आहे.  38 वर्षीय धोनी लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असून, त्याच्याकडे लेफ्टनंट कर्नलपद आहे. 2011साली भारतीय लष्करानं त्याला हा मान दिला. भारतीय सैन्यासाठी योगदान देता यावे यासाठी धोनीनं आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तो आता 31 जुलै तो 15 ऑगस्ट या कालावधीत काश्मीर खोऱ्यात व्हिक्टर फोर्ससोबत पेट्रोलिंग करणार आहे. 

 2015मध्ये त्यानं पॅराट्रुपरची परीक्षाही पास केली. त्यानं आग्रा येथील ट्रेनिंग कॅम्पमध्ये आर्मी एअरक्राफ्टकडून पॅराशूट जम्पचे प्रशिक्षण घेतले आणि त्यात तो पासही झाला. पण, सैन्यसेवत दाखल होणारा धोनी हा पहिलाच क्रिकेटपटू नाही. धोनी हा 106 टेरिटॉरियर आर्मी बटालियनचा भाग असणार आहे आणि तो 15 दिवस काश्मीर खोऱ्यात पेट्रोलिंग, गार्ड आणि पोस्ट ड्युटीचं काम पाहणार आहे. शिवाय तो तेथे सैनिकांसोबत राहणारही आहे.

भारतीय कसोटी संघाचे पहिले कर्णधार कॉलोनेल कोट्टारी कनकिया नायुडू हेही सैन्यात होते. शिवाय लेफ्टनन कॉलोनेल हेमू अधिकारी यांचे कसोटी पदार्पण वर्ल्ड वॉर टू मुळे लांबणीवर पडले होते. त्यांनीही सैन्यसेवा केली आहे. त्यानंतर चंद्रशेखर गडकरी, नरैन स्वामी, रमन सुरेंद्रनाथ, अपूर्वा सेनगुप्ता आणि वेनाटप्पा यांनीही सैन्यसेवा केली आहे.

महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन हेही लेफ्टनन होते. त्यांनी जून 1940साली ऑस्ट्रेलियन एअर फोर्स जॉईन केली होती. त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियन आर्मीत ट्रान्सफर घेतली आणि त्याचे प्रशिक्षणही त्याने घेतले. पण, त्यांच्या प्रकृतीत वैद्यकीय दोष आढळल्यामुळे त्यांना जून 1941मध्ये सैन्यातून निवृत्त करण्यात आले. इंग्लंडच्या सर लेन हटन यांनीही सहा वर्ष सैन्य प्रशिक्षण घेतले. तेथे त्यांच्या मनगटाला दुखापत झाली आणि त्याचा क्रिकेट कारकिर्दीवरही परिणाम झाला. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीसर डॉन ब्रॅडमन