Join us  

आर्मीची ट्रेनिंग संपवून धोनी परतला आणि हळवा झाला...

धोनी ज्या बटालियनमध्ये सहभागी होऊन पहारा देत आहे, ती बटालियन विशेष सैनिकांची आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 4:36 PM

Open in App

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात पंधरा दिवस भारतीय सैन्यांसोबत पहारा देणारा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी घरी परतला. नवी दिल्ली विमानतळावर त्याला भेटण्यासाठी पत्नी साक्षी आणि मुलगी जिवा हे उपस्थित होते. यावेळी आपल्या लाडक्या झिवाला धोनी बिलगल्याचे पाहायला मिळाले. एका बाजूला आर्मीमध्ये पहारासाठी गेलेला धोनी झिवा मात्र झिवा भेटला तेव्हा हळवा झाल्याचे पाहायला मिळाले.

धोनी ज्या बटालियनमध्ये सहभागी होऊन पहारा देत आहे, ती बटालियन विशेष सैनिकांची आहे. धोनीला येथे दिवस आणि रात्र अशा शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे. यावेळी धोनीकडे पाच किलो वजनाच्या 3 मॅग्जीन, 3 किलोचे पोशाख, 2 किलोची बूटं, 4 किलोचे 3 ते 6 ग्रेनेड, 1 किलोचे हॅल्मेट आणि 4 किलोचे बुलेटप्रुफ जॅकेट असे एकूण 19 किलो वजन असणार आहे. धोनी यावेळी 50-60 सैनिकांसोबत बंकरमध्ये राहणार आहे. 38 वर्षीय धोनी लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असून, त्याच्याकडे लेफ्टनंट कर्नलपद आहे. 2011साली भारतीय लष्करानं त्याला हा मान दिला. 2015मध्ये त्यानं पॅराट्रुपरची परीक्षाही पास केली. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारतीय जवान