Join us  

MS Dhoni Retirement : 'त्या' धक्क्यातून धोनी सावरलाच नव्हता; म्हणून निवृत्तीसाठी निवडली 7.29 ही वेळ!

माझ्या या प्रवासात तुम्ही दिलेल्या पाठिंबा आणि प्रेमाबद्दल आभार... 7.29 मिनिटांपासून मला तुम्ही क्रिकेटमधून निवृत्त झालो असं समजा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 2:45 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं शनिवारी इस्टाग्रामवर पोस्ट लिहून निवृत्ती जाहीर केली. जुलै 2019पासून धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू होती अन् शनिवारी स्वातंत्र्य दिनी धोनीनं निवृत्तीची घोषणा केली.  भारतीय  धोनीनं शनिवारी सायंकाळी 7.29 मिनिटांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून चाहत्यांना मोठा धक्का दिला.  ''माझ्या या प्रवासात तुम्ही दिलेल्या पाठिंबा आणि प्रेमाबद्दल आभार... 7.29 मिनिटांपासून मला तुम्ही क्रिकेटमधून निवृत्त झालो असं समजा,''धोनीनं ही पोस्ट करून चाहत्यांना झटका दिला. निवृत्तीसाठी धोनीनं हीच वेळ का निवडली? 

महेंद्रसिंग धोनीचा पहिला पगार किती होता माहित्येय; आज 760 कोटींचा धनी 

निवृत्तीच्या घोषणेनंतर मेहंद्रसिंग धोनी अन् सुरेश रैनानं मारली मिठी; पाहा इमोशनल Video

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) तीनही स्पर्धा जिंकणारा तो जगातला एकमेव कर्णधार आहे. याशिवाय त्याच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. 50+च्या सरासरीनं वन डे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा खेळाडू, वन डेत सर्वाधिक नाबाद राहणारा खेळाडू, यष्टिरक्षक म्हणून वन डेत सर्वोत्तम वैयक्तिक खेळी, वन डेत सर्वाधिक यष्टिचीत, ट्वेंटी-20 तर शुन्यावर बाद न होता सर्वाधिक काळ खेळणारा फलंदाज, कर्णधार म्हणून सर्वाधिक वन डे सामने खेळणारा, आदी अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत.  

सुरेश रैनाचे 'हे' विक्रम तुम्हाला करतील चकीत! 

... म्हणून महेंद्रसिंग धोनीपाठोपाठ निवृत्तीसाठी सुरेश रैनानं 15 ऑगस्टचा दिवस निवडला

धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.

भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी तू एक आहेस - रोहित शर्मा 

मला माहित्येय तुला रडावासं वाटतंय, पण...; पत्नी साक्षीची भावनिक पोस्ट

10 जुलै 2019चा तो पराभव जिव्हारी लागला?वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना हा धोनीच्या कारकिर्दीचा शेवटचा सामना ठरला. न्यूझीलंडने 8 बाद 239 धावा उभ्या केल्या प्रत्युत्तरात भारताला 49.3 षटकांत सर्वबाद 221 धावाच करता आल्या. पावसामुळे हा सामना दोन दिवस रंगला आणि भारतासमोर 240 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते. धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी भारताच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या, परंतु धोनी धावबाद झाला अन् भारताचे आव्हानही संपुष्टात आले. धोनीनं त्या सामन्यात 50, तर जडेजानं 77 धावा केल्या. हा पराभव धोनीच्या जिव्हारी लागला आणि त्याचवेळी न्यूझीलंडच्या ग्रँड एलिएटनं ट्विट केलं आणि भारताचे आव्हान संपुष्टात आल्याचे जाहीर केलं. त्याच्या ट्विटची वेळ होती 7.29 आणि म्हणून धोनीनं निवृत्तीसाठी हीच वेळ निवडल्याची चर्चा आहे.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीवर्ल्ड कप 2019