Join us  

खरं तर कॅप्टन कूल धोनीने मनिष पांडेला शिवी दिलीच नव्हती; तो म्हणाला होता...

कृपया धोनीविरोधात अपप्रचार करू नका. तो धोनी आहे, विराट कोहली नव्हे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 2:47 PM

Open in App

मुंबई: गेल्या आठवड्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या ट्वेन्टी-20 सामन्यादरम्यान महेंद्रसिंग धोनी मनीष पांडेवर संतापल्याचा किस्सा चांगलाच गाजला. आठवडा उलटला तरी या प्रकरणाची चर्चा थांबायला तयार नाही. यावेळी कॅप्टन कूलचा रुद्रावतार पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का होता. दुसरी धाव न घेता आल्यामुळे धोनीने मनिष पांडेचा भर मैदानात पाणउतारा केला. धोनीने रागाच्या भरात पांडेला उद्देशून काही अपशब्दही उच्चारले. यावरून महेंद्रसिंग धोनीवर प्रचंड टीकाही झाली होती. मात्र, सोशल मीडियावरील काही चाहत्यांनी या प्रकरणात धोनीची पाठराखण केली आहे. मुळात धोनीने मनिष पांडेला उद्देशून अपशब्द उच्चारलेच नाहीत. धोनीने रागात केवळ इतकेच म्हटले की, ओये! बोले थे ना इधर देखने, उधर देख रहा है'. मात्र, या वाक्यातील 'बोले' या शब्दाचा विपर्यास करण्यात आल्याचे धोनीच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. केवळ भाषेच्या वेगळ्या लहेजामुळे लोकांचा तसा समज झाला. कृपया धोनीविरोधात अपप्रचार करू नका. तो धोनी आहे, विराट कोहली नव्हे, असे या चाहत्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीटी-२० क्रिकेट