गतविजेता चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात सलामीच्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सचा सामना करणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली CSK आणखी एक जेतेपद पटकावण्यासाठी तयार आहे. पण, CSKला दीपक चहरची दुखापत व अष्टपैलू खेळाडू मोईन अलीची सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता, या समस्येचा सामना करावा लागणार आहे. अशात त्यांच्या फलंदाजीच्या फळीत काही उणीवा जाणवत आहेत आणि त्या धोनीला सोडवायच्या आहेत.
२०१९च्या वन डे वर्ल्ड कप नंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे आणि त्यानंतर तो केवळ आयपीएलमध्ये खेळतोय. ''महेंद्रसिंग धोनीनं आता फलंदाजीच्या क्रमवारीत पुढे यायला हवं, तो आता पूर्वीसारखा मॅच फिनिशर राहिलेला नाही. फलंदाजीत पुढे येऊन त्याने वेळ घेतला आणि त्याला १० ते ११ षटकं खेळायला मिळाली, तर तो मोठी खेळी साकारू शकतो. CSKसाठी तो महत्त्वाचा खेळाडू आहे,''असे भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू रीतिंदर सिंग सोढी म्हणाला.
आयपीएल २०२०मध्ये त्याने २५च्या सरासरीने २०० धावा केल्या होत्या, परंतु २०२१मध्ये त्याला १६.२८च्या सरासरीने ११४ धावा करता आल्या होत्या. पण, यंदाच्या पर्वात त्याने फलंदाजीचा क्रम बदलला तर जास्त धावा करेल, असा विश्वास सोढीने व्यक्त केला. यासह रवींद्र जडेजाचे कौतुक केले. महेंद्रसिंग धोनीच्या यशाची परंपरा जडेजा पुढे काय ठेवेल असेही तो म्हणाला. ''रवींद्र जडेजाचा फॉर्म हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मोहाली कसोटीत त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, नंतर दमदार गोलंदाजी केली, ही चेन्नई सुपर किंग्ससाठी आनंदाची बातमी आहे. तो चेन्नईला फायनलमध्ये घेऊन जाऊ शकतो. रवींद्र जडेजा, धोनी आदी मोठ्या खेळाडूंवर जास्त जबाबदारी आहे.''असे सोढीने म्हटले.
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबीन उथप्पा ( २ कोटी), ड्वेन ब्राव्हो ( ४.२० कोटी), अंबाती रायुडू ( ६.७५ कोटी), दीपक चहर ( १४ कोटी), केएम आसिफ ( २० लाख), तुषार देशपांडे ( २० लाख), शिवम दुबे ( ४ कोटी), महीश थीक्साना ( ७० लाख), राजवर्धन हंगर्गेकर ( १.५० कोटी), सिमरजीत सिंग ( २० लाख), डेव्हॉन कॉनवे ( १ कोटी), ड्वेन प्रेटोरियस ( ५०लाख), मिचेल सँटनर ( १.९० कोटी), अॅडम मिल्ने ( १.९० कोटी), सुभ्रांषू सेनापती ( २० लाख), मुकेश चौधरी ( २० लाख), प्रशांत सोलंकी ( १.२० कोटी), ख्रिस जॉर्डन ( ३.६० कोटी), सी हरी निशांथ ( २० लाख), एन जगदीसन ( २० लाख), के भगत वर्मा ( २० लाख).