'कॅप्टन कूल' धोनीची सर्वोच्च न्यायालयात धाव, 40 कोटींची मागणी

महेंद्रसिंग धोनीची आम्रपाली ग्रुपविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 11:38 IST2019-03-27T11:38:22+5:302019-03-27T11:38:45+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
MS Dhoni moves SC against Amrapali over endorsement dues of Rs 40 crore | 'कॅप्टन कूल' धोनीची सर्वोच्च न्यायालयात धाव, 40 कोटींची मागणी

'कॅप्टन कूल' धोनीची सर्वोच्च न्यायालयात धाव, 40 कोटींची मागणी

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आम्रपाली ग्रुपविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. धोनीने आम्रपाली ग्रुपकडून ब्रँडिंग आणि मार्केटिंगचे थकित 40 कोटी रुपये देण्याची मागणी केली आहे. आम्रपाली ग्रुपने करारानुसार आपल्याला रक्कम न दिल्याचा आरोप धोनीनं केला आहे.

2009 साली धोनी आम्रपाली ग्रुपला सदिच्छादूत होता. या ग्रुपसोबत धोनीनं 6 वर्ष काम केले. 2016मध्ये या ग्रुपवर हजारो लोकांना गंडवल्याचा आरोप झाला आणि धोनीनं या ग्रुपशी संबंध तोडला. याच कालावधीत सर्वोच्च न्यायालयाने आम्रपाली ग्रुपचे सीएमडी अनिल शर्मा आणि डायरेक्टर शीव प्रिय व अजय कुमार यांना पोलीस कोठडीत पाठवले. 

Web Title: MS Dhoni moves SC against Amrapali over endorsement dues of Rs 40 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.