Join us  

MS Dhoni : हे असं फक्त महेंद्रसिंग धोनीच करू शकतो; जेतेपदाची ट्रॉफी सोपवली दीपक चहरच्या हाती अन्... Video

MS Dhoni handed the trophy to his teammates : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शाह यांच्या हस्ते आयपीएल ट्रॉफी स्वीकरल्यानंतर धोनी ती घेऊन सहकाऱ्यांकडे गेला. त्यानंतर त्यानं तेच केलं, जे तो नेहमी करत आला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 11:27 AM

Open in App

MS Dhoni handed the trophy to his teammates : भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) यानं इंडियन प्रीमिअर लीगमध्येही ( IPL 2021) स्वतःचा दबदबा दाखवून दिला आहे. आयपीएलच्या मागील पर्वात स्पर्धेबाहेर होणारा पहिला संघ ते आयपीएल २०२१मध्ये जेतेपद... चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) या फिनिक्स भरारीची सर्वत्र चर्चा आहे. मागच्या पर्वातील अपयशानंतर धोनीनं आम्ही दमदार पुनरागमन करू, तिच आमची खरी ओळख आहे, असा निर्धार व्यक्त केला होता. आजच्या विजयानं तो निर्धार पूर्ण झाला. चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK won IPL 2021) चौथ्यांदा आयपीएल जेतेपद उंचावले. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शाह यांच्या हस्ते आयपीएल ट्रॉफी स्वीकरल्यानंतर धोनी ती घेऊन सहकाऱ्यांकडे गेला. त्यानंतर त्यानं तेच केलं, जे तो नेहमी करत आला. 

ऋतुराज गायकवाड  व फॅफ ड्यू प्लेसिस ही जोडी यंदाच्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी सलामीवीर जोडी ठरली. त्यांनी ७५२ हून अधिक धावा केल्या. ऋतुराज ( ३२), रॉबीन उथप्पा (१५ चेंडूंत ३ षटकारांसह ३१ धावा), मोईन अली (३७) आणि . फॅफनं ( ५९ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ८६ धावा) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईनं ३ बाद १९२ धावा केल्या. कोलकाताचा ल्युकी फर्ग्युसननं ५६ धावा दिल्या. सुनील नरीननं २६ धावांत २ विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात शुबमन गिल ( ५१) व वेंकटेश अय्यर ( ५०) यांनी ९१ धावांची सलामी दिली. ११व्या षटकात KKRच्या डावाला कलाटणी मिळाली. शार्दूल ठाकूरनं ११व्या षटकात वेंकटेश ( ५०)  व नितीश राणा ( ०) यांना माघारी पाठवले. त्यानंतर कोलकातानं विकेट्सची रांग लावली. सुनील नरीन ( २), गिल (५१), इयॉन मॉर्गन ( ४), दिनेश कार्तिक (९), शाकिब अल हसन (०), राहुल त्रिपाठी ( २) हे अपयशी ठरले. दीपक चहरनं ३१ धावांत १, रवींद्र जडेजानं ३७ चेंडूंत २ विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूडनंही दोन, तर शार्दूरनं ३८ धावांत ३ विकेट्स घेतल्या.

जेतेपदाची ट्रॉफी धोनीनं दीपक चहरच्या हाती सोपवली अन् स्वतः एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. 

पाहा व्हिडीओ...

 

टॅग्स :आयपीएल २०२१महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App