MS Dhoni on IPL Retirement : पुढील वर्षी माझं आयपीएल खेळणे, न खेळणे, हे बीसीसीआयच्या हाती; महेंद्रसिंग धोनी म्हणाला, I haven’t left behind

IPL 2021, I haven't left it behind, MS Dhoni : इंडियन प्रीमिअर लीगचे चौथे जेतेपद पटकावल्यानंतर हा महेंद्रसिंग धोनीचा ( Ms Dhoni) आयपीएलमधील शेवट आहे का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 01:40 AM2021-10-16T01:40:42+5:302021-10-16T01:41:17+5:30

MS Dhoni on IPL Retirement : CSK Captain MS Dhoni Sheds Light on His IPL Future, Claims it Depends on BCCI, Say I haven’t left behind to Harsha Bhogle | MS Dhoni on IPL Retirement : पुढील वर्षी माझं आयपीएल खेळणे, न खेळणे, हे बीसीसीआयच्या हाती; महेंद्रसिंग धोनी म्हणाला, I haven’t left behind

MS Dhoni on IPL Retirement : पुढील वर्षी माझं आयपीएल खेळणे, न खेळणे, हे बीसीसीआयच्या हाती; महेंद्रसिंग धोनी म्हणाला, I haven’t left behind

Next

IPL 2021, I haven't left it behind, MS Dhoni : इंडियन प्रीमिअर लीगचे चौथे जेतेपद पटकावल्यानंतर हा महेंद्रसिंग धोनीचा ( Ms Dhoni) आयपीएलमधील शेवट आहे का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. चेन्नई सुपर किंग्स ( CSK)नं चौथ्यांदा आयपीएल जेतेपद जिंकले. मुंबई इंडियन्सनंतर ( ५) सर्वाधिक जेतपदाच्या विक्रमात CSKनं एक पाऊल आणखी पुढे टाकले. CSKच्या १९२ धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) सुरुवात दणक्यात केली, परंतु ११व्या षटकात शार्दूल ठाकूरनं सामना फिरवला. बिनबाद ९१ वरून कोलकाताचे ९ फलंदाज ७४ धावांत माघारी परतले.  


ऋतुराज गायकवाड  व फॅफ ड्यू प्लेसिस ही जोडी यंदाच्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी सलामीवीर जोडी ठरली. त्यांनी ७५२ हून अधिक धावा केल्या. ऋतुराज ( ३२), रॉबीन उथप्पा (१५ चेंडूंत ३ षटकारांसह ३१ धावा), मोईन अली (३७) आणि . फॅफनं ( ५९ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ८६ धावा) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईनं ३ बाद १९२ धावा केल्या. कोलकाताचा ल्युकी फर्ग्युसननं ५६ धावा दिल्या. सुनील नरीननं २६ धावांत २ विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात शुबमन गिल ( ५१) व वेंकटेश अय्यर ( ५०) यांनी ९१ धावांची सलामी दिली. ११व्या षटकात KKRच्या डावाला कलाटणी मिळाली. शार्दूल ठाकूरनं ११व्या षटकात वेंकटेश ( ५०)  व नितीश राणा ( ०) यांना माघारी पाठवले. त्यानंतर कोलकातानं विकेट्सची रांग लावली. सुनील नरीन ( २), गिल (५१), इयॉन मॉर्गन ( ४), दिनेश कार्तिक (९), शाकिब अल हसन (०), राहुल त्रिपाठी ( २) हे अपयशी ठरले. दीपक चहरनं ३१ धावांत १, रवींद्र जडेजानं ३७ चेंडूंत २ विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूडनंही दोन, तर शार्दूरनं ३८ धावांत ३ विकेट्स घेतल्या.

महेंद्रसिंग धोनी काय म्हणाला?
''चेन्नईच्या विजयाबद्दल बोलण्याआधी मी कोलकाता नाइट रायडर्सबद्दल बोलेन. इथपर्यंत मजल मारणे हे त्यांच्यासाठी दमदार पुनरागमनासारखेच होते आणि ही गोष्ट अत्यंत आव्हानात्मक होती. यंदाच्या आयपीएलमध्ये जेतेपदासाठी कोण खरं पात्र असेल तर तो कोलकाताचा संघ. याचे श्रेय हे प्रशिक्षक, संघ आणि सपोर्ट् स्टाफला द्यायला हवं. मधल्या काळात मिळालेला ब्रेक अत्यंत फायदेशीर ठरला. CSKबद्दल सांगायचे तर आम्ही सातत्यपूर्ण कामगिरी करत एकामागून एक विजय मिळवले.  मागच्या पर्वातील अपयशानंतरचा हा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे,''असे महेंद्रसिंग धोनी म्हणाला. 

  • यावेळी हर्षा भोगले त्याला म्हणाले - मागे सोडून चाललेल्या वारशाचा तुला अभिमान वाटायला हवा
  • त्यावर धोनी म्हणाला - मी अजून काहीच सोडलेलं नाही. ( हसत हसत) 


निवृत्तीबाबत धोनी म्हणाला ( MSD on IPL Retirement) 
पुढील पर्वात बीसीसीआय दोन नवीन फ्रँचायझींचा समावेश करणार आहे. त्यामुळे बीसीसीआयवर सर्व अवलंबून आहे. यावर हर्षा भोगले म्हणाले, नाही MS, हा निर्णय तुझ्या आणि CSK मधील आहे. धोनीनं यावरही स्पष्ट केलं की, चेन्नई सुपर किंग्सकडून मी खेळणार की नाही, हे महत्त्वाचे नाही. CSKसाठी काय सर्वोत्तम आहे, ते महत्त्वाचे आहे. कोअर ग्रुपनं १० वर्ष या टीमला सांभाळले आणि आता पुढे संघहिताचे काय आहे, ते पाहायला हवे. 

Web Title: MS Dhoni on IPL Retirement : CSK Captain MS Dhoni Sheds Light on His IPL Future, Claims it Depends on BCCI, Say I haven’t left behind to Harsha Bhogle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app