पंचांच्या निर्णयाविरोधात मैदानात धाव घेणे धोनीला भोवले, सामनाधिकाऱ्यांनी 50 टक्के मानधन कापले

काल रात्री आयपीएलमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत शेवटच्या षटकात पंचांच्या निर्णयाविरोधात मैदानात धाव घेणे महेंद्र सिंह धोनीला भोवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 04:01 PM2019-04-12T16:01:03+5:302019-04-12T16:02:34+5:30

whatsapp join usJoin us
MS Dhoni fined 50 percent match fees for Code of conduct breach | पंचांच्या निर्णयाविरोधात मैदानात धाव घेणे धोनीला भोवले, सामनाधिकाऱ्यांनी 50 टक्के मानधन कापले

पंचांच्या निर्णयाविरोधात मैदानात धाव घेणे धोनीला भोवले, सामनाधिकाऱ्यांनी 50 टक्के मानधन कापले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जयपूर -  काल रात्री आयपीएलमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सने राजस्थान रॉयल्सवर मात करत सहाव्या विजयाची नोंद केली. मात्र या सामन्यातील शेवटच्या षटकात पंचांच्या निर्णयाविरोधात मैदानात धाव घेणे महेंद्र सिंह धोनीला भोवले आहे. धोनीच्या या कृतीमुळे शिस्तभंग झाल्याचा ठपका ठेवत त्याला सामन्यातील मानधनाच्या 50 टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

आयपीएलमध्ये गुरुवारी रात्री राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेला सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला होता. या सामन्यात चेन्नईला शेवटच्या षटकात  विजयासाठी 18 धावांची गरज असताना बेन स्टोक्सने स्वैर मारा केला. दरम्यान, स्टोक्सने टाकलेला एक चेंडू पंच उल्हास गंधे यांनी नोबॉल ठरवला. मात्र स्वेअर लेग अंपायर ब्रुस ऑक्सनफोर्ड यांच्याशी चर्चा केल्यानंतर गंधे यांनी आपला निर्णय मागे घेतला. पंचांच्या या निर्णयामुळे चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी वैतालगला. त्याने थेट मैदानात धाव घेतली. तसेच नोबॉलबाबत 
 पाहून तो चक्क मैदानात घुसला आणि अंपायरला नो बॉल असताना निर्णय मागे का घेतला याबाबत विचारले. यावेळी धोनीच्या कधी नव्हे ते नाराजीचे हावभाव चेहऱ्यावर होते. धोनीच्या या कृतीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.  दरम्यान, धोनीच्या या कृतीची सामनाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. धोनीचे कृत्य हे आयपीएलच्या आचारसंहितेमधील कलम 2.20 अंतर्गत लेव्हल 2 चा अपराध असल्याचे, तसेच कलम 2.20 नुसार खिलाडुवृत्तीविरोधात असल्याचे  स्पष्ट करण्यात आले असून, त्याला सामन्यातील एकूण मानधनापैकी 50 टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीच्या आचारसंहितेनुसार पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केल्यास एक कसोटी किंवा दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्याची कारावी होऊ शकते.  

Web Title: MS Dhoni fined 50 percent match fees for Code of conduct breach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.