Join us  

MS Dhoni : १३ वर्षांनंतर महेंद्रसिंग धोनीनं पूर्ण केलं चाहत्याचे स्वप्न, पाहा फोटो 

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मैदानापासून बाहेर असूनही धोनी चर्चेत आहेच.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2021 6:04 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मैदानापासून बाहेर असूनही धोनी चर्चेत आहेच. धोनीनं त्याच्या कारकीर्दितून अनेकांना प्रेरणा दिली आणि त्यामुळेच टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार, यष्टिरक्षक म्हणून त्याचे नाव आदरानं घेतलं जातं. सध्या धोनी कुटुंबीयांसोबत शिमला येथे फिरायला गेला आहे आणि आगामी आयपीएल २०२१ स्पर्धेतून तो पुन्हा मैदानावर फटकेबाजी करताना दिसेल. शिमला दौऱ्यावर असलेल्या धोनीनं त्याच्या चाहत्याची १३ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणली. चाहत्यानं १३ वर्षांपासून उराशी बाळगलेलं  स्वप्न धोनीनं पूर्ण केलं.

Photo: महेंद्रसिंग धोनीकडून लग्नाच्या वाढदिवसाला साक्षीला भारी गिफ्ट!

हिमाचल प्रदेश येथील रत्नारी येथे धोनी गेला होता आणि तेथील मीनाबाग हॉटेलमध्ये तो थांबला होता. धोनीच्या फॅनला याची माहिती मिळाली आणि त्यानं त्याची बदली रत्नारी येथील मीनाबाग हॉटेलमध्ये करण्याची विनंती केली. धोनीला भेटण्यासाठीचा त्याचा हा आटापीटा कामी आला. देव असे या चाहत्याचे नाव आहे. त्यानं धोनीची भेट घेत मोबाईल कव्हरवर माजी कर्णधाराची स्वाक्षरी घेतली. त्यानं ही गोष्ट इंस्टाग्रमावर पोस्ट केली. 

२००८मध्ये धोनी हिमाचल प्रदेशमध्ये एक स्पर्धा खेळण्यासाठी आला होता. तेव्हा देवनं त्याची भेट घेण्यासाठी सर्व प्रयत्न केले, परंतु त्याला यश आले नाही. आज १३ वर्षांची त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले.   

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीशिमला