Join us  

MS Dhoni New Record, IPL 2022 DC vs CSK: महेंद्रसिंग धोनीचं टी२० क्रिकेटमध्ये अनोखं द्विशतक; इतर क्रिकेटर आसपासही नाहीत!

यंदा धोनीच्या नेतृत्वात CSK ने जिंकला दुसरा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 4:37 PM

Open in App

MS Dhoni New Record, IPL 2022 DC vs CSK: सुरूवातीच्या टप्प्यात अतिशय सुमार कामगिरी करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या CSK ने रविवारी दिल्ली कॅपिटल्स संघावर मोठा विजय मिळवला. डेवॉन कॉनवेच्या ८७, ऋतुराज गायकवाडच्या ४१ धावांच्या जोरावर त्यांनी २०८ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाला फक्त ११७ धावाच करता आल्या. त्यामुळे CSK ला ९१ धावांनी विजय मिळाला. या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्रिकेट विश्वात आणखी एक मोठा विक्रम केला.

दिल्लीविरूद्धच्या सामन्यात धोनीने असा विक्रम केला की त्याच्या आसपासही कोणाला फिरकता येणार नाही. टी२० क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक म्हणून २०० झेल घेणारा धोनी पहिला खेळाडू ठरला. महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर सध्या तो फक्त IPL खेळतो. IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचे नेतृत्व करणाऱ्या धोनीने रविवारी दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धच्या सामन्यात झेल टिपत हा मोठा विक्रम आपल्या नावे केला.

दिल्ली संघाविरुद्धच्या सामन्यात धोनीने दोन झेल घेतले. यामध्ये त्याने प्रथम रोव्हमन पॉवेलला शिकार बनवले. यानंतर धोनीने शार्दुल ठाकूरचा दुसरा झेल घेतला. यासह त्याने यष्टिरक्षक म्हणून टी२० फॉर्मेटमध्ये झेल घेण्याचे द्विशतक पूर्ण केले. आत्तापर्यंत धोनीने यष्टिरक्षक म्हणून एकूण ३४७ टी२० सामन्यात २०० झेल घेतले. धोनी हे सर्व सामने फक्त टीम इंडिया, चेन्नई सुपर किंग्ज आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या तीन संघांसाठीच खेळला.

टॅग्स :आयपीएल २०२२महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्स
Open in App