Join us  

भारतीय वायुसेनेत राफेल विमान दाखल; MS Dhoniने केलं अभिनंदन, सांगितलं फेव्हरिट विमानाचं नाव

सुस्साट वेग, खतरनाक रेंज अन् 70 लाखांचं क्षेपणास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 2:59 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 15 ऑगस्टला त्यानं सोशल मीडियावर पोस्ट केली आणि त्यानंतर आज पुन्हा ट्विट केलं. भारतीय वायुसेनेत आज औपचारिकरित्या राफेल विमान (Rafale fighter jets) दाखल झाले. त्यासाठी धोनीनं ( MahendraSingh Dhoni) भारतीय वायुसेनेचं ( Indian Air Force ) अभिनंदन केलं. राफेलमुळे शेजारील राष्ट्रांना धडकी भरली आहे. भारतीय वायुसेनेचं अभिनंदन करताना धोनीनं ( MS Dhoni) यावेळी त्याच्या फेव्हरिट विमानाचं नाव सांगितलं. राफेल हे त्याचं फेव्हरिट विमान नसल्याचं जाणून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. 

महेंद्रसिंग धोनी 1,250 फुटांवरून झेप घेतो तेव्हा... पाहा थरारक व्हिडीओ

MS Dhoni काय म्हणाला?फायनल इंडक्शन सेरेमनीनंतर जगातील सर्वोत्तम 4.5 जनरेशनच्या लढाऊ विमानांना जगातील सर्वोत्तम लढाऊ पायलट मिळाले. भारतीय वायुसेनेत अनेक तगडे एअरक्राफ्ट आहेत आणि त्याने आपली ताकद अजून वाढली आहे. त्यानंतर त्यानं अजून ट्विट केलं की,''वायुसेनेच्या गोल्डन एरो स्क्वाड्रनमध्ये राफेलचा समावेश झाल्याचे अभिनंदन. राफेल मिराज-2000ला मागे सोडेल, अशी आपण आशा करू, परंतु सुखोई हा माझा आजही फेव्हरिट विमान आहे.''

सुस्साट वेग, खतरनाक रेंज अन् 70 लाखांचं क्षेपणास्त्र, जाणून घ्या राफेल का आहे 'ब्रह्मास्त्र'

राफेलच्या उड्डाणावरूनच त्याच्या मारक क्षमतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. 2,130 किलोमीटर प्रति तास, एवढा प्रचंड वेग, या लढाऊ विमानांना इतर लढाऊ विमानांपेक्षा वेगळं ठरवतो. सर्वात महत्वाचं म्हणजे रडारपासून बचाव करण्याची क्षमता आणि लांबूनच शत्रूवर नजर ठेऊन त्याला नेस्तनाबूत करण्याची क्षमता राफेलला लाभली आहे. आतापर्यंत भारत रशियाकडून मिळालेल्या सुखोई विमानांच्या सहाय्याने चीनला काऊंटर करत होता. मात्र आता भारताच्या ताफ्यात अन् भात्यात राफेल सारखे ब्रम्हास्त्र आले आहे.

राफेलची खासीयत इतर विमानांच्या तुलनेत अद्भूत - सैन्य विषयातील तज्ज्ञ मारूफ रजा यांनी म्हटल्याप्रमाणे, राफेलच्या उड्डाणाचा वेग त्याला जगात सर्वात वेगळे ठरवतो. एवढेच नाही, तर आपल्या सारख्या विमानांच्या तुलनेत राफेल अव्वल आहे. 70 लाख रुपयांच्या हॅमर क्षेपणास्त्राने सज्ज, क्षणात शत्रू उद्धवस्त - राफेल हॅमर मिसाइलने सुसज्ज आहे. ही भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. यामुळे भारताची शक्ती वाढते. भारताचे हे क्षेपणास्त्र कुठल्याही प्रकारचे बंकर अगदी क्षणात उद्ध्वस्त करू शकते. भारतासाठी हे कुठल्याही स्थितीत अत्यंत महत्वाचे आहे. विशेष म्हणजे अत्यंत दुर्गम असलेल्या पूर्व लडाख सारख्या भागाचाही याच्या मारक क्षमतेवर काहीही परिणाम होत नाही.

या क्षेपणास्त्राची मारक क्षमता प्रचंड आहे. हे क्षेपणास्त्र 20 किलोमीटर ते 70 किलो मीटर अंतरावरील लक्षदेखील अगदी अचूकपणे भेदू शकते. ज्या विमानाने हॅमर क्षेपणास्त्र फायर केले जाते, ते विमान, या मिसाईच्या दूरवर अचूक मारा करण्याच्या क्षमतेमुळेच शत्रूच्या एअर डिफेन्सपासून सुरक्षित राहण्यास यशस्वी ठरते. कारण, लांबूनच मारा करता येत असल्याने विमान शत्रूच्या रडारवर दिसू शकत नाही. HAMMER क्षेपणास्त्राच्या किटमध्ये वेगवेगळ्या आकाराचे बॉम्बदेखील लावले जाऊ शकतात. ते 125 किलो, 250 किलो, 500 किलो एवढेच नाही, तर 1000 किलो ग्रॅमचेही असू शकतात.

राफेलला टक्कर देणारं एकही विमान पाकिस्तानकडे नाही 

राफेलमध्ये अनेक अचूक शस्त्र तैनात केली जाऊ शकतात. 300 किलो मीटरपर्यंत अचूक मारा करणारे स्कल्प क्रूझ क्षेपणास्त्र राफेलला सर्वाधिक घातक बनवते. Meteor एअर-टू-एअर मिसाइलचा निशाना कधी चुकत नाही. MICA एअर-टू-एअर क्षेपणास्त्र राफेलला शत्रूपेक्षा वरचढ ठरवते, तर हॅमर क्षेपणास्त्र या विमानाला अजेय ठरवते. त्यांच्याकडे F-16 आहे, मात्र एकटे राफेलच दोन एफ-16 च्या बरोबरीचे आहे. 

सध्या भारताकडे मिग-29, मिराज, सुखोई-30 ही लढाऊ विमानं आहेत. मात्र, यांच्या तुलनेत राफेल एका वेगळ्या जनरेशनचे विमान आहे. हे विमान आपले लक्ष्य अगदी सहजपणे भेजू शकते. एवढेच नाही, तर शेजारील देशांवर अगदी सहजपणे एअरस्ट्राइक करू शकते. भारताने 2016 मध्ये फ्रान्ससोबत 36 राफेल विमानांसाठी 60 हजार कोटी रुपयांचा सौदा केला होता. यात 30 फायटर जेट आहेत, तर 6 ट्रेनर विमानं आहेत.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीराफेल डीलभारतीय हवाई दल