Join us  

निवृत्तीनंतर काय करणार; महेंद्रसिंग धोनीनं निवडलं नवीन करियर, पाहा व्हिडीओ

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 3:51 PM

Open in App

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करेल, असे तर्क लावले जात आहेत. पण, हे सर्व जर आणि तरचं गणित आहे. धोनीनं अजूनही खेळत राहावे अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. पण, वाढत्या वयाबरोबर एकदा ना एकदा धोनीलाही निवृत्ती घ्यावी लागेल. क्रिकेटनंतर धोनी काय करणार? हा प्रश्न मग सर्वांना सतावेल, परंतु याचे उत्तर धोनीनंच दिलं आहे. 

धोनी इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. कदाचित ही त्याची अखेरची वर्ल्ड कप स्पर्धा असेल. त्यामुळे इंग्लंडमध्ये धोनीकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2007चा ट्वेंटी-20 आणि 2011चा वन डे वर्ल्ड कप जिंकला. शिवाय 2013मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीवरही नाव कोरले. 

जगातील सर्वात यशस्वी कर्णधार - यष्टिरक्षक म्हणून आज धोनी ओळखला जातो. अनेक तरुणांचा तो आदर्श आहे, परंतु लहानपणापासून धोनीला क्रिकेटपटू नव्हे तर आर्टिस्ट व्हायचं होतं. हे गुपित धोनीनंच सांगितलं. तो म्हणाला,'' लहानपणापासून मला आर्टिस्ट व्हायचं होतं. बरीच वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर आता मला ते स्वप्न जगायचं आहे. त्याची सुरुवात मी केली आहे. मी काही चित्र काढली आहेत आणि तुम्हाला ती आवडतील अशी आशा व्यक्त करतो.''

 
टॅग्स :महेंद्रसिंग धोनीवर्ल्ड कप २०१९चित्रकला