मुंबई - महेंद्रसिंग धोनीने गेली दहा वर्षे भारतीय क्रिकेटसाठी मोलाचे योगदान दिले. भारताला ( टी-20 आणि वन डे) विश्वचषक जिंकून देण्यात धोनीचा मोठा वाटा आहे. त्याने आपल्या कॅप्टन्सीत भारताला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिले. पण, या प्रवासात वैयक्तिक आयुष्य एंजॉय करण्याची संधी धोनीने अनेकदा गमावली. पण, आता कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झालेला धोनी दहा वर्षांत मागे सुटलेले आनंदाचे क्षण पुन्हा अनुभवत आहे. धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
( संगीत समारंभात अवतरला यंग धोनी )
( 'Captain Cool' धोनीचा खतरनाक स्टंट; तुम्ही पण ट्राय कराच )
इंग्लंडविरूद्धच्या वन डे मालिकेतून मायदेशी परतल्यानंतर धोनीने पत्नी साक्षी व मुलगी जीवासह प्रफुल पटेल यांची कन्या पूर्णा हीच्या लग्नाला हजेरी लावली होती. त्याच लग्नसमारंभात त्याने आपल्या मित्रांसोबतचा बाथरूम व्हिडीओ शेअर केला होता. धोनीने मागील दहा वर्षांत गमावलेल्या सर्व क्षणाचा आता मनमुराद आस्वाद लुटला. त्याने रविवारी शेअर केलेला व्हिडीओ त्याचीच साक्ष देतो. रांचीतील एका धबधब्याखाली धोनी चिंब भिजत आहे. पाहा हा व्हिडीओ...