Join us  

IPL 2021 स्थगित झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी घरी परतला, त्याचा लूक व्हायरल झाला!

इंडियन प्रीमिअर लीगचे १४वे पर्व कोरोना व्हायरसमुळे स्थगित करावे लागल्यानंतर सर्व खेळाडू आपापल्या घरी परतले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 2:07 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी आणि चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( captain MS Dhoni) याचा सोशल मीडियावर नवा लुक व्हायरल होत आहे. इंडियन प्रीमिअर लीगचे १४वे पर्व कोरोना व्हायरसमुळे स्थगित करावे लागल्यानंतर सर्व खेळाडू आपापल्या घरी परतले. इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणारे खेळाडू मुंबईत क्वारंटाईनमध्ये आहेत. पण, धोनीच्या चाहत्यांना त्याच्या लूकची प्रतिक्षा होती आणि त्यांची ही प्रतिक्षा संपली. सोशल मीडियावर सध्या धोनीच्या नव्या लूकचीच चर्चा आहे. आयपीएल २०२१ स्थगित होण्यापूर्वी जसा धोनी दिसत होता, त्यापेक्षा फार वेगळा हा लूक आहे.  Photo : महेंद्रसिंग धोनीच्या फार्म हाऊसचा थाटच न्यारा; 7 एकर परिसरात बांधलाय स्वप्नांचा बंगला!

धोनी सध्या रांची येथीत त्याच्या फार्म हाऊसवर आहे. तो तेथे त्याच्या पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवत आहेत.  ३९ वर्षीय धोनी सप्टेंबर महिन्यात पुन्हा अॅक्शनमध्ये दिसणार आहे. चेन्नईनं ७ सामन्यांपैकी ५ सामने जिंकले आहेत. रांचीमधील मंदिर अन् धोनी...असं आहे श्रद्धेचं नातं; जाणून घ्या सर्वकाही  

आयपीएलच्या नव्या तारखा आल्या समोर; BCCIचा मास्टर प्लान

  • बीसीसीआयनं ( BCCI) मास्टरप्लान तयार केला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आयपीएलचे उर्वरित सामने याच वर्षी खेळवण्याचा पक्का निर्धार केला आहे. त्यादृष्टीनं बीसीसीआयनं २९ मे रोजी महत्त्वाची बैठक बोलावली आहे आणि त्यात या नव्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. बीसीसीआयच्या मदतीला यावेळी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आल्याचे पाहायला मिळत आहे. CSKच्या या 'लेडी लक'ची सोशल मीडियावर हवा; भारतीय क्रिकेटपटूशी आहे तिचं नातं!
  •  आयपीएलचे उर्वरित सामने १९ किंवा २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत खेळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. भारत- इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका १४ सप्टेंबरला संपणार आहे आणि लंडनहून खेळाडू थेट UAEत दाखल होतील.  

    इरफान पठाणच्या पत्नीच्या फोटोवरून सुरू झालाय नवा वाद; क्रिकेटपटू म्हणतो, मी तिचा मालक नाही, जोडीदार!

  • आता त्यांच्यासमोर कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या ( CPL) वेळापत्रकाची अडचण आहे. कॅरेबियन प्रीमिअर लीगचे २०२१ मधील पर्व २८ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर या कालावधीत  खेळवण्यात येणार आहे. यात बदल करण्याची विनंती बीसीसीआयकडून केली जाऊ शकते. बीसीसीआयच्या या नव्या तारखांनुसार १० डबल हेडर सामने होतील, ७ दिवस प्रत्येकी एक सामना आणि ४ प्ले ऑफचे सामने होतील. 
टॅग्स :महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सआयपीएल २०२१