आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल

Most Runs in an Over In IPL: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक टाकणाऱ्या गोलंदाजांबद्दल जाणून घेऊयात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 15:00 IST2025-04-29T14:59:00+5:302025-04-29T15:00:06+5:30

whatsapp join usJoin us
Most Runs in an Over In IPL History | आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सने अफगाणिस्तानच्या करीम जनतला पदार्पणाची संधी दिली. परंतु, आयपीएल पदार्पणाचा सामना करीन जनतसाठी अत्यंत वाईट ठरला. या सामन्यात करीन जनतने एका षटकात एकूण ३० धावा खर्च केल्या. आयपीएलमध्ये एका षटकांत सर्वाधिक धावा करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत करीन जनत त्याचा समावेश झाला. 

गुजरात संघाने ७५ लाख रुपये देऊन करीम जनतला आपल्या संघात सामील केले. शेरफेन रदरफोर्डच्या जागी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यात आले. पण त्याचे पदार्पण असे होईल याची कोणीही कल्पना केली नसेल. राजस्थानविरुद्धच्या कामगिरीनंतर गुजरात पुढील सामन्यात करीमला आणखी एक संधी देण्याचा विचार करेल का? हे पाहणे बाकी आहे.

एका षटकात ३० धावा 
राजस्थानच्या डावातील दहाव्या षटकात वैभव सूर्यवंशी गोलंदाजी करायला आला. त्यावेळी वैभव सूर्यवंशी समोर होता. या षटकातील पहिल्याच चेंडूवर वैभव सूर्यवंशीने षटकार मारला. यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर एक-एक चौकार मारला. षटकाच्या शेवटच्या चेंडूवरही त्याने एक षटकार लागला. यानंतर शुभमन गिलने त्याला पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी बोलावले नाही.

आयपीएलमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा
ख्रिस गेल (फलंदाज)- प्रशांत परमेश्वरन (गोलंदाज): ३७ धावा
रविंद्र जाडेजा (फलंदाज)- हर्षल पटेल (गोलंदाज): ३७ धावा
पॅट कमिन्स (फलंदाज)- डॅनियल सॅम्स (गोलंदाज): ३५ धावा
सुरेश रैना (फलंदाज)- परविंदर अवाना (गोलंदाज): ३३ धावा
ख्रिस गेल (फलंदाज)- रवी बोपारा (गोलंदाज): ३३ धावा

Web Title: Most Runs in an Over In IPL History

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.