Most expensive players in each season of IPL auction : IPLच्या प्रत्येक पर्वात महागडे ठरलेले खेळाडू; २००८मध्ये ६ कोटींची बोली मिळालेला MS Dhoni बनलाय १५० कोटी पगार घेणारा धनी!

Most expensive players in each season of IPL auction- इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी येत्या शनिवार व रविवारी मेगा ऑक्शन होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 07:38 PM2022-02-08T19:38:26+5:302022-02-08T19:38:57+5:30

whatsapp join usJoin us
Most expensive players in each season of IPL auction, MS Dhoni got 6cr in 2008 auction now he becames first cricketer to earn RS 150 crore in IPL History  | Most expensive players in each season of IPL auction : IPLच्या प्रत्येक पर्वात महागडे ठरलेले खेळाडू; २००८मध्ये ६ कोटींची बोली मिळालेला MS Dhoni बनलाय १५० कोटी पगार घेणारा धनी!

Most expensive players in each season of IPL auction : IPLच्या प्रत्येक पर्वात महागडे ठरलेले खेळाडू; २००८मध्ये ६ कोटींची बोली मिळालेला MS Dhoni बनलाय १५० कोटी पगार घेणारा धनी!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Most expensive players in each season of IPL auction- इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी येत्या शनिवार व रविवारी मेगा ऑक्शन होणार आहे.  ( IPL 2022 Mega Auction ).  ५९० खेळाडूंच्या नावांचा समावेश अंतिम यादीत करण्यात आला आहे. या ५९० खेळाडूंमध्ये ३७० भारतीय आणि २२० परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.  यावेळेस २० कोटींची बोली लागण्याची शक्यता आहेत आणि या शर्यतीत श्रेयस अय्यर, इशान किशन, डेव्हिड वॉर्नर, जेसन होल्डर हे आघाडीवर आहेत.  

आतापर्यंत झालेल्या प्रत्येक आयपीएलमध्ये महागडे ठरलेले खेळाडू यांची उजळणी करूया... 

 

  • २००८ -  महेंद्रसिंग धोनी ( ६ कोटी, चेन्नई सुपर किंग्स)
  • २००९ - केव्हिन पीटरसन ( ७.५ कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) आणि अँड्य्रू फ्लिंटॉफ ( ७.५ कोटी, चेन्नई सुपर किंग्स)
  • २०१० - शेन बाँड ( ३.४२ कोटी, कोलकाता नाइट रायडर्स) आणि किरॉन पोलार्ड ( ३.४२ कोटी, मुंबई इंडियन्स)
  • २०११ - गौतम गंभीर ( ११.०४ कोटी, कोलकाता नाइट रायडर्स) 
  • २०१२ - रवींद्र जडेजा ( ९.७२ कोटी, चेन्नई सुपर किंग्स)
  • २०१३ - ग्लेन मॅक्सवेल ( ५.३ कोटी, मुंबई इंडियन्स)
  • २०१४ - युवराज सिंग ( १४ कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
  • २०१५ - युवराज सिंग ( १६ कोटी, दिल्ली डेअऱडेव्हिल्स)
  • २०१६ - शेन वॉटसन ( ९.५ कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
  • २०१७ - बेन स्टोक्स ( १४.५ कोटी, रायझिंग पुणे सुपरजायंट्स)
  • २०१८ - बेन स्टोक्स ( १२.५ कोटी, राजस्थान रॉयल्स)
  • २०१९- वरुण चक्रवर्थी ( ८.४ कोटी, किंग्स इलेव्हन पंजाब) आणि जयदेव उनाडकत ( ८.४ कोटी, राजस्थान रॉयल्स)
  • २०२० - पॅट कमिन्स ( १५.५ कोटी, कोलकाता नाइट रायडर्स)
  • २०२१ - ख्रिस मॉरिस ( १६.२५ कोटी, राजस्थान रॉयल्स)
  • २०२२  - ?????


महेंद्रसिंग धोनीने घेतलाय सर्वाधिक पगार
व्यावसायिक क्रिकेटच्या इतिहासात १५० कोटींचा पल्ला ओलांडणारा महेंद्रसिंग धोनी हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. धोनीनं पहिल्या तीन पर्वात १८ कोटी पगार घेतला. त्यानंतर पुढील तीन पर्वांत त्याचा पगार हा ८.२८ कोटी झाला. २०१४ व २०१५ मध्ये त्यानं १२.५ कोटी प्रती पर्व घेतले. रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळताना त्यानं त्या दोन पर्वात २५ कोटी पगार घेतला. २०१८च्या लिलावात CSKनं त्याला १५ कोटींत संघात कायम राखले. त्यानंतर त्यानं पुढील चार पर्वात CSKकडून ६० कोटी इतका पगार घेतला. आयपीएल २०२२ मध्ये त्याला १२ कोटींत कायम राखले गेले. 

 

Web Title: Most expensive players in each season of IPL auction, MS Dhoni got 6cr in 2008 auction now he becames first cricketer to earn RS 150 crore in IPL History 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.