Join us  

Liam Livingstone 117 Meter Six Video, IPL 2022: आरा रा रा खतरनाक... लिव्हिंगस्टोनचा ११७ मीटर उत्तुंग षटकार अन् सारेच अवाक्

यंदाच्या सीझनमधला हा सर्वात मोठा षटकार ठरला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 2:09 PM

Open in App

Liam Livingstone 117 Meter Six Video, IPL 2022: गुणतालिकेत टॉपर असलेल्या गुजरात टायटन्सला यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं. हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाचा पंजाब किंग्जने ८ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना साई सुदर्शनच्या अर्धशतकामुळे गुजरातने २० षटकांत १४३ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना लियम लिव्हिंगस्टोनने १० चेंडूत नाबाद ३० धावा करत सामन्याचा निकाल लावला. त्याच्या खेळीतील एका षटकाराचं साऱ्यांनीच कौतुक केलं.

पंजाबच्या डावात आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर जॉनी बेअरस्टो एका धावेवर बाद झाला. त्यानंतर शिखर धवन व भानुका राजपक्षे यांनी दमदार फलंदाजी केली. राजपक्षे ४० धावांवर बाद झाला. त्यानंतर लियम लिव्हिंगस्टोन मैदानात आला तेव्हा संघाला ५ षटकांत २७ धावांची आवश्यकता होती. लिव्हिंगस्टोनने मोहम्मद शमीच्या एकाच षटकात ३ षटकार आणि २ चौकार मारून सामना संपवून टाकला. त्यातील एक षटकार हा तब्बल ११७ मीटर लांब गेला. हा यंदाच्या हंगामातील सर्वात लांब षटकार ठरला. हा षटकार पाहून गोलंदाज, फलंदाज, कर्णधार मयंक सारेच अवाक् झाले.

यंदाच्या सीझनमधला हा सर्वात मोठा षटकार ठरला, पाहा Video

त्याआधी, गुजरातच्या डावात सलामीवीर शुबमन गिल ९ धावांवर बाद झाला. वृद्धिमान साहाने चांगली सुरूवात केली, पण तो १७ चेंडूत २१ धावांवर माघारी परतला. कर्णधार हार्दिक पांड्या (१), डेव्हिड मिलर (११), राहुल तेवातिया (११), प्रदीप सांगवान (२), लॉकी फर्ग्युसन (५), अल्झारी जोसेफ (४) यांना फारशी चमक दाखवता आली नाही. वरच्या फळीतील साई सुदर्शनने मात्र अर्धशतक (५० चेंडूत ६५ धावा) झळकावत संघाला १४३ धावांपर्यंत मजल मारून दिली होती. पण पंजाबच्या लियम लिव्हिंगस्टोनच्या फटकेबाजीपुढे ही धावसंख्या पुरेशी ठरली नाही.

टॅग्स :आयपीएल २०२२मोहम्मद शामीहार्दिक पांड्यामयांक अग्रवाल
Open in App