Join us  

सध्याच्या परिस्थितीत IPL 2020 होणं अवघड, BCCIनं मांडलं परखड मत

देशात लॉकडाऊन 4 जाहीर करताना गृह मंत्रालयानं खेळाडूंना स्टेडियम आणि क्रीडा संकुलात जाण्याची परवानगी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 11:54 AM

Open in App

देशात लॉकडाऊन 4 जाहीर करताना गृह मंत्रालयानं खेळाडूंना स्टेडियम आणि क्रीडा संकुलात जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे 23 मार्चनंतर जवळपास दोन महिन्यानंतर खेळाडू पुन्हा मैदानावर सराव करताना दिसतील. शिवाय प्रेक्षकांशिवाय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासही परवानगी मिळालेली आहे. यंदा आयपीएल न झाल्यास बीसीसीआयला 4000 कोटींचा फटका बसेल, अशी माहिती अध्यक्ष सौरव गांगुलीनं दिली. नव्या सुचनेनंतर इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) खेळवण्यात येईल, अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत. पण, तशी शक्यता फार कमी असल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात येत आहे.

मर्यादा ओलांडू नकोस, अन्यथा तुझी लायकी दाखवून देईन; आफ्रिदीच्या विधानानंतर हरभजन सिंग भडकला

22 कोटींना घेऊन आलास, तरी काश्मीर आमचाच होता अन् राहणार; 'गब्बर'नं आफ्रिदीला खडसावलं

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना बीसीसीआयचे अरुण धुमाल यांनी सांगितले की,''सध्याच्या परिस्थितीत आयपीएल होणं शक्य वाटत नाही. अजूनही प्रवासबंदी कायम आहे आणि प्रवासबंदी असताना आयपीएल कशी खेळवली जाऊ शकते? आम्ही त्या मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास करत आहोत. त्यानंतर आम्ही प्लान करू.''

प्रवासबंदी हा मुख्य मुद्दा आहे, परंतु आता खेळाडू सरावाला सुरुवात करू शकतील आणि त्यांच्या तंदुरूस्तीनंतर बीसीसीआय स्पर्धा खेळवण्याचा विचार करेल, असेही धुमाल यांनी सांगितले. 29 मार्च पासून आयपीएलला सुरुवात होणार होती, परंतु लॉकडाऊनमुळे ती 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर लॉकडाऊन वाढला आणि ही स्पर्धा पुढील सुचनेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयला घ्यावा लागला. ही स्पर्धा रद्द झाली, असं बीसीसीआयकडून सांगण्यात येत नाही. या कालावधीत स्थानिक स्पर्धा खेळवण्याचा विचार सुरू आहे.  

जनधन खात्याचा ज्युनिअर क्रिकेटपटूंना त्रास- बीसीसीआयबीसीसीआयला ज्या खेळाडूंचे बँक खाते ‘जनधन’ योजनेंतर्गंत उघडले आहे त्या खेळाडूंच्या खात्यात पुरस्कार रक्कम वळती करण्यासाठी अडचण झाली. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, जवळजवळ सहा ज्युनिअर क्रिकेटपटूंना पुरस्कार रक्कम देताना अडचण आली. कारण त्यांचे बँक खाते जनधन योजनेंतर्गत उघडले होते. अशा खात्यांमध्ये जास्तीत जास्त ५० हजार रुपयांची रक्कम जमा करता येते.

अधिकारी म्हणाले, ‘बीसीसीआयच्या वार्षिक कार्यक्रमात पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या सर्व वयोगटातील क्रिकेटपटूंना दीड लाख रुपये देण्यात येणार होते. सिनिअर खेळाडूंच्या पुरस्कार रकमेचे हस्तांतरण ११ जानेवारी रोजी कार्यक्रमानंतर लगेच करण्यात आले होते. पण, पाच ज्युनिअर क्रिकेटपटूंच्या बँक खात्यामध्ये दीड लाख रुपयांचा व्यवहार होत नव्हता. या खात्यांमध्ये आम्ही अनेकदा रक्कम वळती करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही. आम्ही याबाबत आपल्या बँकेकडे चौकशी केली. त्यावेळी कळले की, या खेळाडूंचे खाते जनधन योजनेंतर्गत उघडले आहे. अशा खात्यामध्ये एकावेळी ५० हजार रुपये जमा करता येतात. 

टॅग्स :आयपीएल 2020बीसीसीआय