Join us  

बंगालमध्ये सुरक्षित आहे, यूपीत असते तर माझ्यासोबत वाईट झालं असतं; हसीन जहाँनं दाखल केली FIR 

हसीन जहाँ सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिला सातत्यानं ट्रोल केलं जातं.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 10:22 AM

Open in App

भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ हिला जीवे मारण्याची व बलात्कार करण्याच्या धमक्या सोशल मीडियावरून दिल्या जात आहे. 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनानंतर हसीन जहाँनं देशातील हिंदूंचे अभिनंदन करणारी पोस्ट लिहिली होती. त्यानंतर तिला कट्टरवाद्यांकडून जीवे मारण्याच्या व बलात्कार करणाऱ्या धमक्या येऊ लागल्या. त्या विरोधात तिनं FIR दाखल केले आहे. यावेळी तिनं बंगालमध्ये आहे म्हणून सुरक्षित आहे, उत्तर प्रदेशमध्ये असते तर काहीतरी वाईट झालं असतं, असा दावा केला. (Hasin Jahan files FIR after receiving rape threats for Ram Mandir post)

हसीन जहाँ सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिला सातत्यानं ट्रोल केलं जातं. राम मंदिर भूमिपूजनानंतर हे प्रकार वाढल्याचं तिनं सांगितलं. तिनं याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही मदत मागितली आहे. हसीन जहाँ पश्चिम बंगालमध्ये तिच्या भावाकडे राहत आहे. तिनं एका टिव्ही चॅनलला सांगितले की. पश्चिम बंगालचे प्रशासन खुप चांगले आहे. उत्तर प्रदेशमध्ये राहत असते, तर आतापर्यंत माझ्यासोबत काहीतरी वाईट झाले असते. अनेक प्रसंग घडले असते. मी आता ज्यांच्याकडे राहतेय, ते माझी काळजी घेत आहेत.''(Hasin Jahan files FIR after receiving rape threats for Ram Mandir post)

''अनेक दिवस माझ्या वैयक्तिक आयुष्यावरून टीका केली गेली. पण, जेव्हा मी एकात्मतेचा संदेश दिला, तेव्हा माला ट्रोल केले गेले,''असेही तिनं सांगितलं. हसीन जहाँनं भारतीय गोलंदाजावर कौटुंबिक हिंसाचारासह अनेक आरोप केले आहेत. ती पुढे म्हणाली,''माझ्यावर टीका करणारे बरेच जण हे मुस्लीम नावाचे आहेत... मला एवढंच सांगायचंय की खरा मुसलमान असं करत नाही. महिलांचा अपमान ते करत नाहीत. कट्टरवादी लोकं समाजात विष पेरत आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. मलाच नव्हे तर ते पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यावरही खालच्या पातळीची टीका करतात.''(Hasin Jahan files FIR after receiving rape threats for Ram Mandir post)

जाणून घेऊया नेमकं काय प्रकरण!5 ऑगस्टला हसीन जहाँनं एक पोस्ट केली होती. त्यात तिनं राम मंदिर भूमिपूजनावर एक पोस्ट लिहिली. हसीन जहाँने पोस्ट केली की,''अयोध्यामध्ये श्रीराम मंदिर भूमिपूजनासाठी समस्त हिंदू समाजाचे अभिनंदन. सर्वांना खूप खूप शुभेच्छा...'' शुभेच्छा देताना तिनं अनेक इमोजी वापरल्या आणि त्या काहींना पसंत आल्या नाही. त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदतनेटिझन्सच्या या पवित्र्यावर हसीन जहाँनं नाराजी व्यक्त केली. तिनं आणखी एक पोस्ट लिहिली की,''5 ऑगस्टला जेव्हा अयोध्येत श्रीराम मंदिर भूमिपूजन झाले तेव्हा मी देशातील हिंदू समाजाला शुभेच्छा दिल्या. हिंदू समाजही मुस्लीमांच्या सणांना शुभेच्छा देतात. परंतु, काही कट्टरवाद्यांना माझ्या या शुभेच्छा आवडल्या नाही आणि त्यांनी माला सोशल मीडियावर शिव्या दिल्या. जीवे मारण्याच्या आणि बलात्कार करण्याच्या धमक्या दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करते की, प्रशासनानं याची गंभीर दखल घ्यावी आणि चौकशीचे आदेश द्यावे. मी सर्वधर्म समभाव जपणाऱ्या देशाची नागरिक आहे आणि अशा घटना घडणे दुर्भाग्याचे आहे.   

View this post on Instagram

5 अगस्त को जब अयोध्या में श्रीराम मंदिर का भूमिपूजन हुआ तो मैंने देश के समस्त हिन्दू समाज को मुबारकबाद दिया क्योंकि हिन्दू समाज भी हम मुस्लिम समाज के त्योहारों पर हमें बधाई देता है। लेकिन कुछ कट्टरपंथियों को यह नागवार गुजरा और उन्होंने मुझे सोशल मीडिया पर गालियां, जान से मारने व रेप तक करने की धमकियां दी। देश की PM श्री नरेन्द्र मोदी जी,गृहमंत्री श्री अमित शाह जी,मुख्यमंत्री सुश्री ममता बनर्जी जी तथा मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी से अनुरोध है कि प्रशासन को इस मामले पर संज्ञान लेने का आदेश दें। हम सर्वधर्म समभाव रखने वाले देश के निवासी हैं, जहां ऐसी बात बेहद दुर्भाग्यपूर्ण है और इससे मैं बेहद दुखी हूं।🙏🙏🙏

A post shared by hasin jahan (@hasinjahanofficial) on

टॅग्स :मोहम्मद शामीराम मंदिरअयोध्या