Join us  

मोहम्मद शमीला न्यायालयाकडून समन्स; पत्नी हसीनने केली तक्रार

इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठीच्या भारतीय संघात मोहम्मद शमीला स्थान देण्यात आलं. पण त्यानंतर काही वेळातच शमीसाठी एक वाईट बातमी आली. न्यायालयाने शमीला समन्स बजावले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 5:18 PM

Open in App
ठळक मुद्देशमीला न्यायालयाने कोणत्या गोष्टीसाठी समन्स  बजावले, ते तुम्हाला माहिती आहे का...

कोलकाता : इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झाला. या संघात मोहम्मद शमीला स्थान देण्यात आलं. पण त्यानंतर काही वेळातच शमीसाठी एक वाईट बातमी आली. एका पोलीस स्थानकाने शमीला समन्स बजावले आहे. त्यामुळे त्याला या गोष्टीला आता सामोरे जावे लागणार आहे. पण शमीला न्यायालयाने कोणत्या गोष्टीसाठी समन्स  बजावले, ते तुम्हाला माहिती आहे का...

शमी आणि त्याची पत्नी हसिन जहाँ यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी कडाक्याचे भांडण झाले होते. त्यावेळी हसीनने शमीवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. शमीने हसीनला एक चेक दिला होता. तो चेक हसीनने बँकेत भरला खरा, पण तिला पैसे मिळाले नाहीत. कारण हा चेक बाऊन्स झाला होता. या गोष्टीची हसीनने पोलीसांकडे तक्रार दाखल केली आणि त्यामुळे शमीला अलीपोर न्यायालयाने समन्स बजावले आहेत.

टॅग्स :मोहम्मद शामीक्रिकेट