Mohammad Shami : 1 कोटीची जग्वार, मोहम्मद शमीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले- भाई गाडी सावकाश चालव...

टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीने त्याच्या नवीन जग्वारसोबचा फोटो शेअर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 02:20 PM2023-01-09T14:20:11+5:302023-01-09T14:20:52+5:30

whatsapp join usJoin us
Mohammad Shami | 1 crore Jaguar, photo shared by Mohammed Shami; Fans said - brother, drive slowly... | Mohammad Shami : 1 कोटीची जग्वार, मोहम्मद शमीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले- भाई गाडी सावकाश चालव...

Mohammad Shami : 1 कोटीची जग्वार, मोहम्मद शमीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले- भाई गाडी सावकाश चालव...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

टीम इंडिया उद्या म्हणजेच 10 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. पहिला सामना गुवाहाटीमध्ये होणार असून, सीनियर बॉलर मोहम्मद शमी या मालिकेतून पुनरागमन करत आहे. वनडे वर्ल्डकप लक्षात घेता शमीचा फॉर्म आणि फिटनेस खूप महत्वाचा आहे. दरम्यान, त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मोहम्मद शमीने त्याच्या लाल जग्वार कारसोबतचा एक फोटो शेअर केला असून, चाहते या फोटोचे कौतुक करत आहेत. शमीने गेल्या वर्षी जुलैमध्येच जग्वारची एफ-टाइप स्पोर्ट्स कार खरेदी केली होती. मोहम्मद शमीचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्याला ऋषभ पंतची आठवण करून दिली आणि वेगात गाडी न चालवण्याचा सल्ला दिला.

चाहत्यांनी लिहिले की, प्लीज सावकाश चालव, काही चाहत्यांनी लिहिले की, ही खूप वेगवान कार आहे, सावध रहा भाऊ. मोहम्मद शमीला चाहत्यांनी वेगात गाडी न चालवण्याचा सल्ला दिला. तसेच त्याच्या पुनरागमनासाठी शुभेच्छा दिल्या.

मोहम्मद शमीने आपला शेवटचा वनडे सामना जुलै 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. जवळपास 6 महिन्यांनंतर तो संघात परतत आहे. टीम इंडिया 10 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात करणार आहे. या वर्षी एकदिवसीय विश्वचषक होणार आहे, म्हणूनच आता प्रत्येक एकदिवसीय सामना आणि मालिका महत्वाची असणार आहे.

एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही संघ
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), विराट कोहली, शुभमन गिल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि जसप्रीत बुमराह.

श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), नुवानिडू फर्नांडो, अविष्का फर्नांडो, अशेन बंडारा, पथुम निसांका, धनंजय डिसिल्व्हा, चरित अस्लंका, चमिका करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदिरा समरविक्रमा (विकेटकीपर), प्रमोदकान, प्रमोदकान, प्रमोदशमन ड्युनिथ वेलागे, जेफ्री वांडरसे, कसून रजिथा, लाहिरू कुमारा आणि महिश तिक्ष्णा.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक:
10 जानेवारी - पहिला वनडे, गुवाहाटी, दुपारी 1.30 वा
12 जानेवारी - दुसरी वनडे, कोलकाता, दुपारी 1.30 वा
15 जानेवारी - तिसरा वनडे, तिरुवनंतपुरम, दुपारी 1.30 वा

 

Web Title: Mohammad Shami | 1 crore Jaguar, photo shared by Mohammed Shami; Fans said - brother, drive slowly...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.