Join us  

Corona Virus : 85 वर्षीय आजीच्या निःस्वार्थ सेवेला मोहम्मद कैफचा सलाम; तुम्हालाही वाटेल अभिमान 

लॉकडाऊनमुळे मजूरांच्या स्थलांतराचा प्रश्न अधिक बिकट होत चालला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 12:08 PM

Open in App

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 42 लाख 56,538 वर गेली असून त्यापैकी 15 लाख 27,726 रुग्ण बरे झाले आहेत. पण, मृतांचा आकडा 2 लाख 87,353 वर पोहोचला आहे. भारतातील रुग्णांचा आकडा 70 हजाराच्या वर गेला आहे. त्यापैकी 22,549 रुग्ण बरे झाले आहेत आणि 2294 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. लॉकडाऊनमुळे मजूरांच्या स्थलांतराचा प्रश्न अधिक बिकट होत चालला आहे. प्रत्येक राज्य त्यांच्यापरीनं मजूरांसाठी सर्वतोपरी उपाययोजना करत आहेत. तरीही अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या मजूरांसाठी 85 वर्षीय के कमलथाल या आजी पुढे आल्या आहेत. त्यांच्या निःस्वार्थ सेवेला भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनं सलाम ठोकला आहे.

तामीळनाडूच्या के कमलथाल हा आजी मागील 30 वर्ष केवळ 1 रुपयांत इडली विकत आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेक उद्योग बंद झाले असतानाही आर्थिक नुकसान सहन करत आजींनी मजरूसांठी इडली विकण्याचं काम सुरूच ठेवलं आहे. कैफनं के कमलथाल यांचा फोटो शेअर करून त्यांच्या कामाचं कौतुक केलं.  

त्यानं लिहिलं की,''के कमलथाल जी, तामीळनाडू येथील 85 वर्षीय महिला मागील 30 वर्ष 1 रुपयानं इडली विकट आहेत. लॉकडाऊनमध्येही मजूरांसाठी त्यांनी ही सेवा सुरूच ठेवली आहे. त्यांचे हे काम प्रेरणादायी आहे. त्यांच्या कामाला सलाम.''  

Video : MS Dhoniच्या नव्या लूकवर युजवेंद्र चहल म्हणतो, थाला वन मोर टाईम!

वीरू, गंभीरला शिवीगाळ करू शकतो, पण...; Shoaib Akhtar पुन्हा बरळला

महेंद्रसिंग धोनीनं रागात बॅट फेकली अन् ड्रेसिंग रुममध्येही आदळआपट केली; इरफान पठाणनं सांगितला किस्सा

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यातामिळनाडूसकारात्मक कोरोना बातम्या