Join us

पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमीर पुणे संघाकडून खेळणार!

पाकिस्तान क्रिकेट मंडळ ( PCB) आणि निवड समिती मानसिक छळ करत असल्याचा आरोप करत गोलंदाज मोहम्मद आमीरनं ( Mohammad Amir) गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

By स्वदेश घाणेकर | Updated: December 18, 2020 16:53 IST

Open in App

पाकिस्तान क्रिकेट मंडळ ( PCB) आणि निवड समिती मानसिक छळ करत असल्याचा आरोप करत गोलंदाज मोहम्मद आमीरनं ( Mohammad Amir) गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्या या दाव्यानं पाकिस्तान क्रिकेट वर्तुळ ढवळून निघाले आणि त्यावरून आता चर्चा सुरू आहे. निवृत्ती जाहीर करणारा आमीर आता पुण्याच्या संघाकडून खेळणार आहे. २८ जानेवारी २०२१पासून सुरू होणाऱ्या टी१० लीमध्ये आमीर आता पुणे डेव्हिल्स ( Pune Devils) संघाकडून खेळणार आहे. 

आगामी T10 लीगमध्ये पुणे डेव्हिल्स हा नवा संघ मैदानावर उतरणार आहे. या संघानं मुख्य प्रशिक्षक म्हणून जाँटी ऱ्होड्सला करारबद्ध केले आहे, तर श्रीलंकेचा अष्टपैलू थिसारा परेरा हाही याच संघाचा भाग आहे. T10 लीगचे चौथे पर्व अबु धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

पुणे डेव्हिल्स संघाचे सहमालक कृष्णा कुमार चौधरी यांनी सांगितले की, जगभरातील स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या लीगचा भाग झाल्याचा आनंद आहे. जाँटी आमचे मुख्य प्रशिक्षक असतील, तर थिसारा, आमीर हे मोठे खेळाडूही संघात आहेत.'' 

टॅग्स :टी-10 लीगपाकिस्तान