Join us  

Mithali Raj Retire : मिताली राजला संघातून वगळण्याची लागली होती कुणकुण?; BCCI ने आगामी मालिकेसाठी जाहीर केला संघ

India women's team for Sri Lanka tour announced : भारताची सर्वात यशस्वी महिला क्रिकेटपटू मिताली राज हिने (  Mithali Raj Retire ) बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 6:15 PM

Open in App

India women's team for Sri Lanka tour announced : भारताची सर्वात यशस्वी महिला क्रिकेटपटू मिताली राज हिने (  Mithali Raj Retire ) बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.  महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू, वन डे क्रिकेटमध्ये सलग 7 अर्धशतकं असे अनेक विक्रम नावावर असलेल्या मितालीच्या पुढील वाटचालीसाठी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यापासून क्रिकेटवर्तुळातील अनेकांनी शुभेच्छा दिल्या. तेच बीसीसीआयने सायंकाळी आगामी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी वन डे व ट्वेंटी-20 संघ जाहीर केले. या मालिकेसाठी संधी मिळणार नाही, अशी कुणकुण मितालीला लागली असावी आणि म्हणूनच तिने निवृत्ती जाहीर केली असावी, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

मितालीने १२ कसोटी २३२ वन डे आणि ८९ ट्वेंटी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यापैकी १२ कसोटी सामन्यात १ शतक आणि ४ अर्धशतकांच्या मदतीने तिने ६९९ धावा  केल्या. वन डेत तिने ५०.६८ च्या सरासरीने ७ हजार ८०५ धावा काढल्या आहेत. त्यामध्ये ७ शतके आणि ६४ अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी-२० क्रिकेटमध्येही मितालीने चमक दाखवली. तिने ८९ टी-२० सामन्यात ३७.५२ च्या सरासरीने २ हजार ३६४ धावा जमवल्या. त्यामध्ये १७ अर्धशतकांचा समावेश आहे.

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बीसीसीआयने आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी महिला संघ जाहीर केले. मितालीच्या निवृत्तीमुळे भारताच्या महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आले आहे. 23 जूनपासून तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या या मालिकेला सुरूवात होणार आहे.

ट्वेंटी-20 संघ - हरमनप्रीत कौर ( कर्णधार), स्मृती मानधना ( उप कर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटीया ( यष्टीरक्षक), एस मेघना, दीप्ती शर्मा, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, सिमरन बहादूर, रिचा घोष ( यष्टीरक्षक), पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग, जेमिमा रॉड्रीग्ज, राधा यादव ( T20I Squad - Harmanpreet Kaur (Captain), Smriti Mandhana (VC), Shafali Verma Yastika Bhatia (wk), S Meghna, Deepti Sharma, Poonam Yadav, Rajeshwari Gayakwad, Simran Bahadur, Richa Ghosh (wk), Pooja Vastrakar, Meghna Singh, Renuka Singh, Jemimah Rodrigues, Radha Yadav.)

वन डे संघ - हरमनप्रीत कौर ( कर्णधार), स्मृती मानधना ( उप कर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटीया ( यष्टीरक्षक), एस मेघना, दीप्ती शर्मा, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, सिमरन बहादूर, रिचा घोष ( यष्टीरक्षक), पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग, तानिया भाटीया ( यष्टीरक्षक), हर्लीन देओल ( ODI squad: Harmanpreet Kaur (Captain), Smriti Mandhana (VC), Shafali Verma, Yastika Bhatia (wk), S Meghna, Deepti Sharma, Poonam Yadav, Rajeshwari Gayakwad, Simran Bahadur, Richa Ghosh (wk), Pooja Vastrakar, Meghna Singh, Renuka Singh, Taniya Bhatia (wk), Harleen Deol.)    

टॅग्स :मिताली राजभारतीय महिला क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App