Join us  

Mithali raj: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत मिताली राजची धमाल, केली मोठ्या विक्रमाची नोंद 

Mithali Raj News: भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 4:28 PM

Open in App

नवी दिल्ली - भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. मिताली राज हिने तिच्या क्रिकेट कारकीर्दीमधील २० हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. मितालीने फर्स्ट क्लास क्रिकेट, लिस्ट ए आणि टी-२० क्रिकेट अशा तिन्ही प्रकारात मिळून २० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. त्याबरोबरच मितालीने सलग पाचव्या अर्धशतकाची नोंद केली आहे. तिच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ८ बाद २२५ धावा कुटल्या. (Mithali Raj's record in the first ODI against Australia)

मिताली राज हिने कप्तानी खेळी करताना १०७ चेंडूत ६१ धावांची अर्धशतकी खेळी केली. तिचे एकदिवसीय क्रिकेटमधील हे सलग पाचवे आणि एकूण ५९ वे अर्धशतक ठरले. मितालीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद ७९, त्यानंतर इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यात ७२, ५९ आणि नाबाद ७५ धावा फटकावल्या. मितालीचा हा २१८ वा एकदिवसीय सामना होता.

या लढतीत भारतीस संघ अडचणीत असताना मितालीने एक बाजू लावून धरली. तिच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताला २०० धावांचा टप्पा ओलांडणे शक्य झाले. मितालीबरोबरच ऋचा घोष हिने ३२ धावांची खेळी केली. तर झूलन गोस्वामी हिने २० धावांचे योगदान दिले. त्याशिवाय यास्तिका भाटियामे ३५ धावा केल्या. स्मृती मंधाना हिला मात्र मोठी खेळी करण्यात अपयश आले. तिला केवळ १६ धावाच जमवता आल्या. 

टॅग्स :मिताली राजभारतीय महिला क्रिकेट संघ
Open in App