मिताली, एकता, हरमनप्रीत आयसीसीच्या सर्वोत्कृष्ट संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:14 AM2017-12-22T01:14:09+5:302017-12-22T01:14:28+5:30

whatsapp join usJoin us
 Mithali, Ekta, Harmanpreet, ICC's best team | मिताली, एकता, हरमनप्रीत आयसीसीच्या सर्वोत्कृष्ट संघात

मिताली, एकता, हरमनप्रीत आयसीसीच्या सर्वोत्कृष्ट संघात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई : भारतीय संघाची कर्णधार मिताली राज हिला आयसीसीच्या वार्षिक वन डे संघात स्थान मिळाले असून, डावखुरी गोलंदाज एकता बिश्त हिची वन डे आणि टी-२० संघात वर्णी लागली आहे. या दोघींशिवाय हरमनप्रीत कौरला आयसीसी टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे.
इंग्लंडची हिथर नाईट हिच्याकडे वन डे तर वेस्ट इंडिजची स्टेफाने टेलर हिच्याकडे टी-२० संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. २१ सप्टेंबर २०१६ ते आतापर्यंतच्या कामगिरीच्या आधारे खेळाडूंची निवड करण्यात आली. उत्तराखंडची ३१ वर्षांची एकता वन डे आणि टी-२० संघात स्थान मिळविणारी एकमेव भारतीय आहे. ती सध्या १२ व्या रँकिंगवर आहे. वन डे संघात पाच देशांचे खेळाडू आहेत. (वृत्तसंस्था)
आयसीसीचे वार्षिक सर्वश्रेष्ठ संघ असे -'
वन डे संघ : टॅमी ब्यूमोंट, मेग लेनिंग, मिताली राज, अ‍ॅमी सॅटर्थवेट, एलिसे पेरी, हिथर नाईट (कर्णधार), सारा टेलर (यष्टिरक्षक), डेन वॉन निकर्क, मारिजाने काप, एकता बिश्त आणि अ‍ॅलेक्स हार्टले.
वन डे संघ : टॅमी ब्यूमोंट, मेग लेनिंग, मिताली राज, अ‍ॅमी सॅटर्थवेट, एलिसे पेरी, हिथर नाईट (कर्णधार), सारा टेलर (यष्टिरक्षक), डेन वॉन निकर्क, मारिजाने काप, एकता बिश्त आणि अ‍ॅलेक्स हार्टले.

Web Title:  Mithali, Ekta, Harmanpreet, ICC's best team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.