Join us  

मिसबाहच्या नकारात्मक प्रतिक्रियेचा संघावर वाईट परिणाम होईल : इंझमाम

मुख्य प्रशिक्षक व निवडकर्ते मिस्बाह उल-हक यांनी नकारात्मक हावभाव दाखविल्यामुळे पाकिस्तानचे माजी कर्णधार इंझमाम-उल-हक यांनी टीका केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 2:40 AM

Open in App

लाहोर : इंग्लंडविरुद्ध रविवारी दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान मुख्य प्रशिक्षक व निवडकर्ते मिस्बाह उल-हक यांनी नकारात्मक हावभाव दाखविल्यामुळे पाकिस्तानचे माजी कर्णधार इंझमाम-उल-हक यांनी टीका केली. इंग्लंडने विजयासाठी १९६ धावांचे लक्ष्य पाच गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.इंग्लंडचा स्कोअर ज्यावेळी बिनबाद ६५ होता त्यावेळी मिस्बाह आपला हात चेहरा व डोक्यावर ठेवत निराश असल्याचे दिसत होते.इंझमाम म्हणाले, ‘ज्यावेळी संघ मैदावर संघर्ष करीत असतो त्यावेळी अशाप्रकारची प्रतिक्रिया नकारात्मक संदेश देते.’

टॅग्स :आंतरराष्ट्रीय क्रिकेटपाकिस्तान