Join us  

मेलबोर्न कसोटीत हार्दिक पांड्याला खेळवा - मायकल हसी

‘पहिल्या दोन सामन्यांच्या तुलनेत मेलबोर्नची खेळपट्टी वेगळी असेल. या खेळपट्टीवर अष्टपैलू हार्दिक पांड्या याला संधी देणे भारतासाठी लाभदायी ठरू शकेल,’ असे मत आॅस्ट्रेलयाचा माजी फलंदाज माईक हसी याने व्यक्त केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 5:03 AM

Open in App

मेलबोर्न : ‘पहिल्या दोन सामन्यांच्या तुलनेत मेलबोर्नची खेळपट्टी वेगळी असेल. या खेळपट्टीवर अष्टपैलू हार्दिक पांड्या याला संधी देणे भारतासाठी लाभदायी ठरू शकेल,’ असे मत आॅस्ट्रेलयाचा माजी फलंदाज माईक हसी याने व्यक्त केले आहे. २६ डिसेंबरपासून भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात तिसऱ्या सामन्याला सुरुवात होईल.पर्थ आणि मेलबोर्नच्या खेळपट्ट्या या भिन्न प्रकारच्या आहेत. आतापर्यंतच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सुरेख मारा केला. पर्थमधील तापमान उष्ण असते. तरीही भारतीय गोलंदाजांनी भरपूर षटके टाकली. हार्दिक पांड्या आॅस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शसारखा आहे. तो फॉर्ममध्ये असेल, तर अतिरिक्त गोलंदाज म्हणून त्याचा वापर करता येईल. प्रमुख गोलंदाजांवरचा ताणही हलका होतो. यामुळे हार्दिक पांड्याला संघात घेण्यास हरकत नाही, असे हसीने वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.भारताने चार सामन्यांच्या मालिकेत पहिली कसोटी जिंकून दिमाखदार सुरुवात केली खरी, पण आॅस्ट्रेलियाने पर्थ कसोटीत बरोबरी साधलीच.विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेचा अपवाद वगळता इतर फलंदाजांचे अपयश हा संघाच्या चिंतेचा विषय ठरतो. पर्थमध्ये रविचंद्रन अश्विनची उणीव जाणवल्याचेही हसीने नमूद केले. भारतीय सलामीवीरांची खराब कामगिरी सुरूच राहिल्यास चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना ही जबाबदारी सांभाळावी लागेल. यामुळे विराटवर विसंबून न राहता संतुलन साधता येईल. दोन्ही सलामीवीर चांगले फलंदाज असले तरी सध्या फॉर्ममध्ये नाहीत.’कोहलीच्या कामगिरीवर संघाचा विजय विसंबून आहे का, यावर हसी म्हणाला, ‘कोहली जागतिक दर्जाचा फलंदाज असल्याने त्याच्याकडून अपेक्षा ठेवण्यात काहीच गैर नाही. पहिल्या सामन्यात पुजारा व कोहली यांनी शानदार खेळ केला. परंतु, यानंतर दुसºया सामन्यात फलंदाजीत ताळमेळ साधता न आल्याने भारत पराभूत झाला. (वृत्तसंस्था)कोहली-पेन वाक्युद्ध मर्यादितदुसºया कसोटीदरम्यान उभय संघाचे कर्णधार विराट कोहली आणि टिम पेन यांच्यात गाजलेले वाक्युद्ध मर्यादित होते. दोघांनीही मर्यादा न ओलांडता, कुठलीही असभ्य भाषा न वापरता, आक्रस्ताळेपणा न दाखविता दोन्ही संघाचे खेळाडू वागले. अनेकदा भावनेच्या आहारी जाऊन खेळाडू मर्यादा ओलांडतात. पण या सामन्यात कुणीही मर्यादा ओलांडली नाही, असे हसीने स्पष्ट केले. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया