Join us  

#MeToo: ‘मीटू’प्रकरणात नाव येऊनही 'या' खेळाडूला मिळाले संघात स्थान

त्याने भारतातील एका गायिकेला आपल्या रुममध्ये ओढून घेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी हॉटेलमधील स्टाफने प्रसंगावधान दाखवल्यामुळे त्या गायिकेची सुटका करण्यात आली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 2:43 PM

Open in App
ठळक मुद्दे ‘मीटू’प्रकरणात नाव आलेल्या एका खेळाडूला तब्बल 12 महिन्यांनंतर संघात जागा मिळाली आहे.

नवी दिल्ली : ‘मीटू’ मोहिम ही सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. ‘मीटू’मध्ये नाव आलेल्या व्यक्तींना आपली पदे सोडावी लागत आहे. पण ‘मीटू’प्रकरणात नाव आलेल्या एका खेळाडूला तब्बल 12 महिन्यांनंतर संघात जागा मिळाली आहे.

आयपीएलमुळे क्रिकेट विश्व एका छताखाली आले आहे. त्यामुळे अनेक परदेशी खेळाडू आयपीएलदरम्यान भारतात येतात. आयपीएलच्या एका हंगामामध्ये हा खेळाडू भारतात आला होता. भारतात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तो वास्तव्याला होता. यावेळी त्याने भारतातील एका गायिकेला आपल्या रुममध्ये ओढून घेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी हॉटेलमधील स्टाफने प्रसंगावधान दाखवल्यामुळे त्या गायिकेची सुटका करण्यात आली होती.

‘मीटू’ ही मोहीम सुरु झाल्यानंतर भारतामधील गायिका चिन्मयी श्रीपादने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगावर विनयभंगाचा आरोप केला होता. क्रिकेट विश्वासाठी हा मोठा धक्का होता. पण या गोष्टीचा कोणताही परीणाम श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळावर झालेला नाही. कारण त्यांनी मलिंगाला इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या ट्वेन्टी-20 संघात स्थान दिले आहे.

टॅग्स :मीटूआयपीएलश्रीलंकालसिथ मलिंगा