Join us  

BBL: मुलाखत सुरू असताना भारतीय चाहत्याने प्रेयसीला केलं प्रपोज; मॅक्सवेलकडून अभिनंदन, VIDEO

BBL 2024: सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग स्पर्धा पार पडत आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 5:55 PM

Open in App

प्रसिद्धीसाठी कोण कोणत्या थराला जाईल कल्पना न केलेलीच बरी... लाईव्ह सामन्यादरम्यान प्रेमीयुगुलांनी एकमेकांना प्रपोज केल्याची घटना अनेकदा पाहायला मिळाली आहे. सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग स्पर्धा पार पडत आहे, जिथे देखील प्रेमीयुगुलाचे प्रपोज प्रकरण पाहायला मिळाले. मेलबर्न स्टार्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यातील सामन्यादरम्यान भारतीय चाहत्याने त्याच्या प्रेयसीला प्रपोज केले. मेलबर्न स्टार्सच्या भारतीय चाहत्याने मेलबर्न रेनेगेड्सच्या समर्थक असलेल्या आपल्या मैत्रिणीला गुडघ्यावर बसवून प्रपोज केले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खरं तर सामन्यादरम्यान हे कपल वेगवेगळ्या संघांनार पाठिंबा देत होते. त्याचवेळी अँकर त्यांच्यापर्यंत पोहोचला अन् त्याने त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरूवात केली. अँकरने विचारले की, तुम्ही दोघे वेगवेगळ्या संघांना पाठिंबा देता, त्यामुळे नात्यात काही तणाव निर्माण झाला आहे का? ज्याला भारतीय चाहत्याने उत्तर देताना म्हटले, "मी मेलबर्न स्टार्सचा मोठा चाहता आहे आणि ती रेनेगेड्सची चाहती आहे, परंतु तिला ग्लेन मॅक्सवेल आवडतो आणि मी देखील मॅक्सवेलचा चाहता आहे, म्हणून मी तिला इथे आणले आहे." एवढ्यात संबंधित चाहत्याने खिशातून अंगठी काढली आणि गुडघ्यावर त्याच्यासोबत आलेल्या मैत्रिणीला प्रपोज केले. मुलाचे हे कृत्य पाहून मुलीलाही धक्का बसला. सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत.

मॅक्सवेलनेही केले जोडप्याचे अभिनंदन  या सामन्यानंतर या जोडप्याने मेलबर्न स्टार्सचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेलची भेट घेतली. यावेळी मॅक्सवेलने या कपलचे अभिनंदन केले. मॅक्सवेलने त्याच्यासोबत एक फोटोही क्लिक केला. केएफसी बिग बॅश लीगच्या हँडलवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे.

या सामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर, ग्लेन मॅक्सवेलच्या नेतृत्वाखाली मेलबर्न स्टार्सने मेलबर्न रेनेगेड्सचा आठ गडी राखून पराभव केला. पावसामुळे हा सामना १४ षटकांचा खेळवण्यात आला, ज्यामध्ये मेलबर्न रेनेगेड्सने प्रथम फलंदाजी करताना सात गडी गमावून ९७ धावा केल्या. मेलबर्न स्टार्सने १२.१ षटकांत दोन गडी गमावून हे लक्ष्य गाठले.  

टॅग्स :ग्लेन मॅक्सवेलऑफ द फिल्डदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टबिग बॅश लीग