Join us  

IPL 2021 Auction बाबत मोठी बातमी; संघ संख्याही वाढवणार, अहमदाबाद शर्यतीत?

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयपीएल 2021साठी लिलाव होणार नसल्याची चर्चा रंगली होती. आधी मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय हे लिलाव रद्द करण्याची चर्चा होती.

By स्वदेश घाणेकर | Published: November 11, 2020 1:38 PM

Open in App

कोरोना व्हायरसच्या संकटात BCCIनं इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL 2020) १३वे पर्व UAEत यशस्वीरित्या आयोजन केले. मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) पराभूत करून पाचव्यांदा आयपीएल चषक उंचावला. आता बीसीसीआयनं पुढील वर्षीच्या आयपीएलसाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. एप्रिल-मे महिन्यात IPL 2021 भारतातच घेण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. कोरोना परिस्थिती न सुधारल्यास UAEचा पर्याय बीसीसीआयनं ठेवला आहे. पण, आयपीएल 2021साठी ऑक्शन होणार की नाही, याबाबत बीसीसीआयकडून मोठे अपडेट्स मिळत आहेत.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयपीएल 2021साठी लिलाव होणार नसल्याची चर्चा रंगली होती. आधी मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय हे लिलाव रद्द करण्याची चर्चा होती. पण, न्यू इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयनं सर्व फ्रँचायझींना IPL 2021 Auction च्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. बीसीसीआय आयपीएल 2021चाही मेगा ऑक्शन घेणार आहे. 

''येत्या काही महिन्यात होणाऱ्या ऑक्शनसाठी तयार राहण्याचे बीसीसीआनं फ्रँचायझींना सांगितले आहे. अजून त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु बीसीसीआयनं अशा सूचना केल्यात, म्हणजे त्यांनी त्याची तयारी सुरू केली असेल. नवा संघाचा समावेश होणार असेल, तर ऑक्शन घेण्यात अर्थ आहे,''असे एका फ्रँचायझीच्या अधिकाऱ्यानं न्यू इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.  

येणाऱ्या आयपीएलमध्ये बीसीसीआय नव्या संघाच्या समावेशाच्याही तयारीत आहे. अहमदाबादचा संघ आगामी आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता आहे. अहमदाबाद येथे सरदार पटेल स्टेडियम बांधल्यानंतर तशी चर्चा सुरू झालीच होती. मेगा ऑक्शनमध्ये फ्रँचायझींनी संघातील तीन प्रमुख खेळाडूंना कायम ठेवता येईल आणि दोन राईट टू मॅच खेळाडूंचा पर्याय त्यांच्याकडे असेल. याबाबत अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहे.  

टॅग्स :IPL 2020बीसीसीआय