Join us

मीडिया हक्क लिलाव : बीसीसीआयवर पैशांचा वर्षाव

भारताच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या द्विपक्षीय क्रिकेट मालिका प्रसारणाचे मीडीया हक्क मिळवण्यासाठी झालेल्या इ - लिलावाच्या पहिल्या दिवशी तब्बल ४ हजार ४४२ करोड रुपयांपर्यंत बोली पोहचली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 01:59 IST

Open in App

नवी दिल्ली - भारताच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या द्विपक्षीय क्रिकेट मालिका प्रसारणाचे मीडीया हक्क मिळवण्यासाठी झालेल्या इ - लिलावाच्या पहिल्या दिवशी तब्बल ४ हजार ४४२ करोड रुपयांपर्यंत बोली पोहचली. हे हक्क मिळवण्यासाठी स्तार, सोनी आणि जियो या कंपन्यांमध्ये मोठी चढाओढ रंगली. यामुळे बीसीसीआयवरे पुन्हा एकदा पैशांचा वर्षाव होणार हे नक्की आहे.भारतात पुढील पाच वर्षांमध्ये आयोजित होणाºया क्रिकेटच्या तिन्ही प्रकारच्या मिळून १०२ सामन्यांच्या टीव्ही प्रसारण आणि डिजिटल अधिकारांसाठी ही लिलाव प्रक्रीया सुरु आहे. यावेळी सर्वात पहिली बोली ४,१७६ करोड किंमतीची लागली आणि यानंतर प्रत्येकी २५ - २५ करोड किंमतीची वाढ होत राहिली. बुधवारी सकाळी ११ वाजता ही प्रकीया पुन्हा सुरु होईल. (वृत्तसंस्था)

टॅग्स :बीसीसीआयक्रिकेट