Join us

मयंक अग्रवालची नाबाद द्विशतकी खेळी

सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवालच्या नाबाद २२० धावांच्या खेळीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध पहिल्या चार दिवसीय कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर रविवारी २ बाद ४११ धावांची मजल मारली आणि आपली पकड मजबूत केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 04:19 IST

Open in App

बेंगळुरू : सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवालच्या नाबाद २२० धावांच्या खेळीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध पहिल्या चार दिवसीय कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर रविवारी २ बाद ४११ धावांची मजल मारली आणि आपली पकड मजबूत केली. दुसºया दिवशीचा खेळ थांबला त्या वेळी भारत ‘अ’ संघाने १६५ धावांची आघाडी घेतली होती आणि त्यांच्या ८ विकेट शिल्लक होत्या. आज दिवसअखेर द्विशतकी खेळी करणाºया अग्रवालला कर्णधार श्रेयस अय्यर (९) साथ देत होता.त्याआधी, कालच्या ८ बाद २४६ धावसंख्येवरून पुढे खेळताना दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाला आज धावसंख्येत भर घालता आली नाही. तीन चेंडूंच्या अंतरात त्यांनी दोन विकेट गमावल्या. मोहम्मद सिराने (५-५६) आज पहिल्या चेंडूवर बेयुरन हेंड्रिक्सला बाद केले आणि तिसºया चेंडूवर डुआने ओलिवियरला तंबूचा मार्ग दाखविला.भारताच्या वेगवान गोलंदाजांनी ९ बळी घेतले. त्यात पाच बळी घेणाºया सिराजव्यतिरिक्त नवदीप सैनी (२-४७) आणि रजनीश गुरबानी (२-४७) यांनीही चांगला मारा केला. लेगस्पिनर यजुवेंद्र चहलने एक बळी घेतला.>आक्रमक सुरुवातभारत ‘अ’ संघाने आपल्या डावाची सुरुवात आक्रमक केली. शॉ व अग्रवाल यांनी वेगाने धावा फटकावत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना ५८ व्या षटकापर्यंत यश मिळू दिले नाही. दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाला पहिले यश डेन पीटने (५६ धावात १ बळी) पृथ्वी शॉला क्लिन बोल्ड करीत मिळवून दिले. संघाला दुसरे यश ओलिवियर (१-६९) याने मिळवून दिले. त्याने समर्थला बाद केले.

> अग्रवालने सलामीला पृथ्वी शॉसोबत (१३६) २७७ धावांची भागीदारी केली. शॉने १९६ चेंडूंना सामोरे जाताना १३६ धावा फटकावल्या. त्याने शतकी खेळीत २० चौकार १ षटकार लगावला. अग्रवालने २५० चेंडूंना सामोरे जाताना ३१ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद २२० धावा केल्या. त्याने रविकुमार समर्थसोबत (३७) दुसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली.