Join us  

मयांक अग्रवालने फायनलच्या संघातून अर्जुन तेंडुलकरला वगळले, नेमके काय घडले?

Deodhar Trophy final - सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप पाडण्यासाठी मेहनत घेतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 6:38 PM

Open in App

Deodhar Trophy final - सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप पाडण्यासाठी मेहनत घेतोय. आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केल्यानंतर अर्जुन सध्या देवधर ट्रॉफीमध्ये गोलंदाजी करताना दिसला. पण मयांक अग्रवालच्या नेतृत्वाखालील दक्षिण विभाग संघाने अंतिम फेरीत अर्जुनला वगळले. यामागे त्याची कामगिरी असल्याचे मानले जात आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज विदावथ कवेरप्पाचा समावेश करण्यात आला आहे.

अर्जुनने तो देवधर ट्रॉफीमध्ये दक्षिण विभागाकडून दोन सामने खेळले. ज्यामध्ये अर्जुनने पहिल्या सामन्यात ईशान्य विभागाविरुद्ध १ विकेट घेतली होती, तर मध्य विभागाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात २ घेता आल्या. आयपीएल २०२३ मध्ये पंजाब किंग्ज संघाचा भाग असलेल्या विद्वथ कवेरप्पाने आपल्या गोलंदाजीने कहर केला आहे. देवधर ट्रॉफीच्या चार सामन्यांत विदावथ कवेरप्पाने आतापर्यंत ११ बळी घेतले आहेत. ज्यामध्ये त्याने उत्तर विभागाविरुद्ध १७ धावांत ५ विकेट्सही घेतल्या होत्या. 

बाकी गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. त्यामुळेच दक्षिण विभागीय संघाने साई किशोर, वासुकी कौशिक आणि विजय कुमार वैशाक या गोलंदाजांना अंतिम फेरीत संधी दिली. मात्र, अर्जुनला स्थान मिळवता आले नाही. अर्जुनने या वर्षी आयपीएलमध्ये एकूण चार सामने खेळले आणि ३ विकेट्स राहिल्या. अर्जुन पूर्वी मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळायचा. मात्र अधिक संधी न मिळाल्याने अर्जुन आता गोवा संघासोबत देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसत आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुनने आतापर्यंत ७ प्रथम श्रेणी सामन्यात १२ बळी घेतले आहेत.  

टॅग्स :अर्जुन तेंडुलकरमयांक अग्रवाल
Open in App