Join us  

सामना रंगतदार अवस्थेत; इशांत शर्माचे पाच बळी, सॅम क्युरानचे चिवट अर्धशतक

गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर भारताचे आघाडीचे फलंदाज दुसऱ्या डावातही ढेपाळले आहेत. मुरली विजय, शिखर धवन, लोकेश राहूल, अजिंक्य रहाणे यांच्या निराशाजनक कामगिरीनंतर विराट कोहलीच्या चिवट खेळीमुळे भारत दिवसाअखेर ५ बाद ११० धावांवर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2018 3:32 AM

Open in App

एजबस्टन, बर्मिंघम : गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर भारताचे आघाडीचे फलंदाज दुसऱ्या डावातही ढेपाळले आहेत. मुरली विजय, शिखर धवन, लोकेश राहूल, अजिंक्य रहाणे यांच्या निराशाजनक कामगिरीनंतर विराट कोहलीच्या चिवट खेळीमुळे भारत दिवसाअखेर ५ बाद ११० धावांवर आहे. इंग्लंडने दुसºया डावात दिलेले १९४ धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी अजून ८४ धावांची गरज आहे.भारताच्या इंग्लंड दौºयातील पहिला कसोटी सामना चांगलाच रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. भारताच्या इशांत शर्मा आणि आर. अश्विन यांनी भेदक मारा करत इंग्लंडचे आघाडीचे फलंदाज तंबूत पाठवले. मात्र सॅम क्युरेन याने अधर्शतक झळकावत इंग्लंडला दुसºया डावात १८० धावांची मजल मारून दिली. डाव संपला तेव्हा इंग्लंडकडे १९३ धावांची आघाडी होती. विजयासाठी १९४ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात दुसºया डावातही खराब झाली. संघ फक्त १९ धावांवर असताना स्टुअर्ट ब्रॉड याने मुरलीला पायचीत केले. त्यानंतर ब्रॉड यानेच शिखर धवनला बाद केले.बेन स्टोंक्स याने अष्टपैलू शिखर धवनला बेअरस्टोकडे झेल देण्यास भाग पाडले. तर क्युरानने अजिंक्य रहाणेचा अडथळा दूर केला. त्या वेळी भारताची ४ बाद ६४ धावा अशी अवस्था होती. संघ व्यवस्थापनाने दिनेश कार्तिक ऐवजी सहाव्या स्थानावर अश्विनला बढती दिली. तोही फक्त १३ धावा करून बाद झाला.मुरली विजय वगळता इतर चारही फलंदाज झेलबाद झाले आणि त्यांचे झेल इंग्लंडचा यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टो याने घेतले.त्यानंतर विराट कोहली याने दिनेश कार्तिकसोबत ३२ धावांची नाबाद भागीदारी केली.तत्पूर्वी गुरुवारी सायंकाळी आर. अश्विन याने अलेस्टर कुलला बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला होता. त्यानंतर आज सकाळी त्यानेच के.के. जेनिंग्ज आणि कर्णधार जो रुट यांना बाद केले.त्यानंतर कोहलीने मोहम्मद शमीच्या जागी इशांत शर्माकडे चेंडू सोपवला. शर्मा याने ३० व्या षटकात जॉनी बेअरस्टो, बेन स्टोंक्स, आणि जोश बटलर यांना बाद करत इंग्लंडची मधली फळी तंबूत पाठवली. डेविड मालन यालादेखील इशांतनेच बाद केले.चहापानापर्यंत इंग्लंडची अवस्था ६ बाद ८६ अशी होती. चहापानानंतर इशांतने लगेचच जोश बटलरला बाद करत आपला कसोटीतील २४३ वा बळी घेतला.इंग्लंडचा डाव लगेचच बाद होईल, असे वाटत असतानाच सॅम क्युरान इंग्लंडसाठी उभा राहिला. त्याने तळाच्या फलंदाजांना सोबत घेत इंग्लंडला १८० चा आकडा गाठून दिला. सॅम क्युरान याने ६५ चेंडूत ९ चौकार आणि दोन षटकार लगावत ६३ धावांची खेळी साजरी केली. क्युरान याने आदिल राशिदसोबत ४८ धावांची भागिदारी केली. उमेश यादव याने आदिल राशिदाला बाद करत ही भागीदारी फोडली. क्युरानने स्टुअर्ट ब्रॉडला साथीला घेत धावसंख्येत ४१ धावांची भर घातली. अखेर उमेश यादवने क्युरानला बाद करत इंग्लंडचा डाव संपवला.(वृत्तसंस्था)धावफलकइंग्लंड पहिला डाव सर्वबाद २८७ भारत पहिला डाव सर्वबाद २७४इंग्लंड दुसरा डाव अलेस्टर कुक गो. अश्विन ०, के.के. जेनिंग्ज झे. राहूल गो. अश्विन ८, जो रुट झे. राहूल गो. अश्विन १४, डेविड मालन झे. रहाणे गो. शर्मा २०, जॉनी बेअरस्टो झे. धवन गो. शर्मा २८, बेन स्टोंक्स झे. कोहली गो. शर्मा ६, जोश बटलर झे. कार्तिक गो. शर्मा १, सॅम क्युरान झे. कार्तिक गो. यादव ६३, आदिल राशिद गो यादव १६, स्टुअर्ट ब्रॉड झे. धवन गो. शर्मा ११, जेम्स अँडरसन नाबाद ० अवांतर १३गोलंदाजी - मोहम्मद शमी १२-२-३८-०, आर. अश्विन २१-४-५९-३, इशांत शर्मा १३-०-५१-५, उमेश यादव ७-१-२०-२भारत दुसरा डाव मुरली विजय पायचीत ब्रॉड ६, शिखर धवन झे. बेअरस्टो गो. ब्रॉड १३, लोकेश राहूल झे. बेअरस्टो गो. स्टोंक्स १३, विराट कोहली नाबाद ४३, अजिंक्य रहाणे झे. बेअरस्टो गो. क्युरान २, आर. अश्विन झे. बेअरस्टो गो. अँडरसन १३, दिनेश कार्तिक नाबाद १८, अवांतर २.गोलंदाजी - जेम्स अँडरसन, ११-२-३३-१, स्टुअर्ट ब्रॉड ९-१-२९-२, बेन स्टोंक्स १०-१-२५-१, सॅम क्युरान ५-०-१७-१.

टॅग्स :इशांत शर्माक्रिकेट