Join us

मारिया शारापोवा परतणार कोर्टवर

पाच वेळेची चॅम्पियन रशियाची मारिया शारापोवा अमली द्रव्यसेवनात १५ महिन्यांच्या ‘बंदीचा वनवास’ संपवून पुन्हा टेनिस कोर्टवर परतणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 04:50 IST

Open in App

न्यूयॉर्क : पाच वेळेची चॅम्पियन रशियाची मारिया शारापोवा अमली द्रव्यसेवनात १५ महिन्यांच्या ‘बंदीचा वनवास’ संपवून पुन्हा टेनिस कोर्टवर परतणार आहे. २८ आॅगस्टपासून सुरू होत असलेल्या अमेरिकन ओपनमध्ये मारियाला ‘वाईल्ड कार्ड’ प्रवेश मिळाला.याच आठवड्यात जाहीर झालेल्या रँकिंगमध्ये जगात १४८व्या स्थानावर असलेल्या शारापोवाला नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपनमध्ये ‘वाईल्ड कार्ड’ मिळू शकले नव्हते. त्याआधी जांघेत झालेल्या दुखापतीमुळे ती विम्बल्डनमध्ये खेळू शकली नाही. तेव्हापासून मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी शरापोवाला वाईल्ड कार्डची गरज भासत आहे.