Join us  

न्यूझीलंडचा पूर्ण संघच ठरला मॅन ऑफ द मॅच

ही गोष्ट आहे 1995-96 सालची. न्यूझीलंडचा हा सामना वेस्टइंडीज.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 8:39 PM

Open in App

नवी दिल्ली : सामन्यात जो खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करतो, त्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जातो. पण न्यूझीलंडच्या संघाच्या बाबतीत एक गोष्ट अशी घडली आहे की, संपूर्ण संघालाच मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आला होता.

ही गोष्ट आहे 1995-96 सालची. न्यूझीलंडचा हा सामना वेस्टइंडीज. या दोन्ही संघांतील एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी केली होती. प्रथम फलंदाजी करताना  न्यूझीलंडने 35.5 षटकांमध्ये 158 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर अंकुश कायम ठेवला. त्यामुळे न्यूझीलंडला वेस्ट इंडिजच्या संघाला 154 धावांमध्ये गुंडाळले होते. या सामन्यात न्यूझीलंडच्या सर्व खेळाडूंनी जवळपास सारखेच योगदान दिले होते. त्यामुळे यावेळी न्यूझीलंडच्या संपूर्ण संघाला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आला होता.

 

टॅग्स :न्यूझीलंडवेस्ट इंडिज