Join us  

विजयी लय कायम राखू : रोहित शर्मा

आॅस्ट्रेलियाविरुद्ध विजयाचा धडाका जिथे थांबला होता, तिथूनच पुढे न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत विजयी लय कायम ठेवण्याचा निर्धार टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा याने व्यक्त केला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 2:16 AM

Open in App

मुंबई : आॅस्ट्रेलियाविरुद्ध विजयाचा धडाका जिथे थांबला होता, तिथूनच पुढे न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत विजयी लय कायम ठेवण्याचा निर्धार टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा याने व्यक्त केला आहे. रोहितने आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत एक शतक तसेच दोन अर्धशतकांसह सर्वाधिक २९६ धावा ठोकल्या होत्या.वानखेडे स्टेडियममध्ये संघाचा सराव आटोपल्यानंतर रोहितने पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणाला,‘ न्यूझीलंडने दोन सराव सामने खेळल्यामुळे येथील परिस्थितीशी त्यांचे खेळाडू एकरुप झाले असावेत. आम्ही सुरुवात कशी करतो आणि सांघिक कामगिरी कशी होते, यावर बरेच अवलंबून असेल. आॅस्ट्रेलियाविरुद्धची विजयी लय या मालिेकत कायम राहील. आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान कमी दिवसांंचे अंतर आहे. आमचे खेळाडू फॉर्ममध्ये असल्याने विजयासाठी फारसा त्रास जाणार नाही.’नवी मालिका सुरू झाली की वेगळी आव्हाने असतात, अशी कबुली देत रोहित पुढे म्हणाला,‘आमच्या जमेची बाब अशी की मालिकेत येणाºया प्रत्येक आव्हानांना आम्ही यशस्वीपणे सामोरा जातो. प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाची बलस्थाने आणि उणिवा असतात.त्यादृष्टीने प्रतिस्पर्धी संघाला लवकर समजून घेणे हे आमच्यापुढील आव्हान असेल. आम्ही आॅस्ट्रेलियाविरुद्ध ४-१ ने जिंकलो. तो संघ वेगळ्या प्रकारे तगडा संघ आहे. न्यूझीलंड संघाचे संयोजन वेगळेच आहे. त्यामुळे आमचे डावपेचही परिस्थितीनुरुप ादलतील.’(वृत्तसंस्था)फिरकीचा सामना करण्यावर भर : लॅथममुंबई : भारताविरुद्ध उद्यापासून सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेदरम्यान कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल या फिरकी जोडीचा सामना कसा करायचा यावर आमचे लक्ष केंद्रित असल्याचे मत न्यूझीलंडचा खेळाडू टॉम लॅथम याने म्हटले आहे.लॅथमने बोर्ड एकादशविरुद्ध सराव सामन्यात ३३ धावांनी विजय नोंदविल्यानंतर हे मत व्यक्त केले. तो म्हणाला,‘वेगवान गोलंदाजी खेळणे कठीण नाही पण फिरकी माºयास तोंड देत धावसंख्या कशी उभारायची याची अधिक चिंता आहे. फिरकी माºयास तोंड देताना चेंडू सीमारेषेपार कसा पोहोचवायचा ही आमची मुख्य चिंता असेल.

टॅग्स :रोहित शर्माक्रिकेटभारतन्यूझीलंड